

Karnataka Congress Government Latest News : महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी मंत्री बी. नागेंद्र राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. मात्र, नागेंद्र यांच्या कार्यालयाने या वृत्ताचे स्पष्टपणे खंडन करत राजीनाम्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले आहे. नागेंद्र यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
कर्नाटकातील कथित ९० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नागेंद्र यांच्यावर भाजप आणि जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडीएसने गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने नागेंद्र यांच्यासह काँग्रेस सरकारला लक्ष्य करण्यात आले होते. नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी देखील सरकारवर राजकीय दबाव वाढवण्यात आला होता. यानंतर नागेंद्र यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त होते. त्यामुळे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले होते.
नागेंद्र यांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांना फोन करून, ‘माझ्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये म्हणून मी राजीनामा देतो’, असे म्हटल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय कळवू, असे उत्तर दिल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, नागेंद्र यांच्या कार्यालयाने या वृत्ताचे स्पष्टपणे खंडन करत राजीनाम्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले आहे. तसेच ईडी आणि लोकायुक्तांच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीत नागेंद्र थेट दोषी नसल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती आहे. मात्र, केंद्रीय तपास संस्था सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात त्यांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे.
घोटाळा उघडकीस आल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनुसूचित जमाती विकास, युवक सेवा व क्रीडामंत्री असलेल्या बी. नागेंद्र यांनी पक्षाची अडचण होऊ नये, या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अलीकडील मंत्रिमंडळ फेररचनेवेळी आपण निर्दोष असल्याचा दावा करत नागेंद्र यांनी पुन्हा मंत्रिपद देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे सांगितले जाते. यावर भाजपने टीका करत, मंत्रिपद न दिल्यास घोटाळ्यातील काही प्रमुख नेत्यांची नावे उघड करण्याची धमकी नागेंद्र यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिल्याचा आरोप केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.