Ram Temple attack plot : राम मंदिर उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशियत युवकाची धक्कादायक कबुली; पाकिस्तान कनेक्शनमुळे खळबळ

20-year-old suspect arrested in Karnataka reportedly revealed shocking plan targeting Ayodhya Ram Temple, security agencies on nationwide alert : कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर येथे अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय संशयित युवकाच्या चौकशीत अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कथित कट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
Ram Temple attack plot
Ram Temple attack plotSarkarnama
Published on
Updated on

Ram Temple attack conspiracy : देशातील सुरक्षाव्यवस्थेला हादरवून सोडणारी एक अत्यंत गंभीर माहिती कर्नाटकातून समोर आली आहे. कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर येथे अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय संशयित युवकाच्या चौकशीत अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कथित कट उघड झाल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे.

या प्रकरणामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, दहशतवादविरोधी पथके आणि राज्य पोलिस यंत्रणा हायअलर्टवर गेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शाहजहानपूरचा रहिवासी असलेला सुहैल नावाचा युवक हरिहरजवळील औद्योगिक भागात एका कारखान्यात पेंटर म्हणून काम करत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुप्तपणे पाळत ठेवली होती. अखेर मंगळवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीदरम्यान सुहैलने चौकशी अधिकाऱ्यांसमोर धक्कादायक माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने अयोध्येतील श्रीराम मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची इच्छा व्यक्त करत त्यासाठी कट रचल्याचे कबूल केल्याचा दावा केला जात आहे. मात्र या कथित कबुलीबाबत अधिकृत पोलिस (Police) तपास यंत्रणांनी अद्याप कोणतीही सविस्तर सार्वजनिक माहिती दिलेली नाही.

Ram Temple attack plot
Mumbai Terror Attack Plot : मुंबईत दहशत हल्ल्याचा मोठा कट उधळला! ISI-दाऊद कनेक्शन उघड; पोलिस अन् सुरक्षा दल होतं टार्गेटवर

मोबाईलमधून गंभीर धागेदोरे

तपासादरम्यान सुहैलच्या मोबाईल फोनमधून अनेक गंभीर धागेदोरे हाती लागल्याचे समोर आले आहे. पोलिसांना त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानचा कंट्री कोड असलेला एक मोबाईल क्रमांक ‘राणा बॉय’ या नावाने सेव्ह केलेला आढळला. याशिवाय पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया नेटवर्क, काही गुप्त ऑनलाइन ग्रुप्स आणि शस्त्रास्त्रांसह काढलेली अनेक छायाचित्रेही तपास यंत्रणांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Ram Temple attack plot
Shiv Sena Leader Attack : रॉड, दांडके, पिस्तुल अन् गँगवॉरचा अँगल? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या युवा नेत्यावर गोळीबारात नगरसेवकासह नऊ जणांविरोधात गुन्हा

कट्टरतावाद्यांच्या संपर्काचा संशय

विशेष म्हणजे, पोलिस तपासात सुहैल ‘मेनन अँड जित्तू-333’ आणि ‘राणाभाई-333’ नावाच्या संशयास्पद ऑनलाइन गटांमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाल्याचे वृत्त आहे. या गटांद्वारे कट्टरतावादी विचारसरणीचा प्रसार, देशविघातक कारवायांचे नियोजन आणि संभाव्य दहशतवादी नेटवर्कशी संपर्क ठेवला जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुहैल आणि त्याच्या संपर्कातील काही व्यक्ती भारतात मोठ्या प्रमाणावर विध्वंसक कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत होते का, याचाही तपास आता सुरू आहे. अधिक चौकशीसाठी मंगळवारी सायंकाळी त्याला तुमकूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिर हे देशातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते. त्यामुळे या कथित कटाकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी पथके आणि राज्य पोलिस समन्वयाने तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.

भारताविरोधात कटाचा संशय

या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून संशयिताचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का? पाकिस्तानमधून त्याला कोणाचे समर्थन होते का? आणि भारतात आणखी मोठा कट रचला जात होता का? याचा आता सखोल तपास सुरू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com