पहिल्यांदाच मिळणार काश्मिरी पंडितांना आरक्षण ; परिसीमन आयोगाची शिफारस

परिसीमन आयोगाच्या अहवालामुळे पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात निवडणुकीचे वारं वाहू लागलं आहे.
Delimitation of J&K
Delimitation of J&K sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : (Delimitation of J&K) केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये (jammu and kashmir) ३७० कलम हटवल्यानंतर तेथील विद्यमान सरकार बरखास्त करत जम्मू काश्मीर राज्याची विभागणी जम्मू काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्र शासित प्रदेशात करण्यात आली.

येथे लवकरच विधानसभा निवडणुकीचं (jammu and kashmir assembly elections) बिगुल वाजणार आहे.विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी आणि इतर अडचणी जाणून घेण्यासाठी परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारकडे सोपविला आहे.

परिसीमन आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारकडे दिला आहे. या अहवालामुळे पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात निवडणुकीचे वारं वाहू लागलं आहे. राजकीय वातावरण तापण्यास सुरवात होणार आहे. या आयोगाची सर्वात मोठी शिफारस केली आहे ती म्हणजे पहिल्यांदाच काश्मिरी पंडितांना (kashmiri pandits) आरक्षण मिळणार आहे.

Delimitation of J&K
मशिदींवरील भोंग्यांवरुन उच्च न्यायालयाने पुन्हा कान टोचले ; याचिका रद्द

परिसीमन आयोगाचा अहवालावर पीडीपीच्या नेत्या व जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. हा अहवाल आपल्याला मंजूर नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

या आयोगाच्या शिफारसीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये भाजपचाच विस्तार होईल, येथील जनतेच्या अधिकार कमी होतील, असे मेहबुबा यांचं म्हणणं आहे.या अहवालानंतर जम्मू काश्मीरमध्ये राजकीय परिवर्तनास सुरवात झाल्याचे चित्र आहे.

Delimitation of J&K
मोठी बातमी : ईडीची देशभरात १८ ठिकाणी छापेमारी ; IAS पूजा सिंघल यांचीही चौकशी

परिसीमन आयोगाच्या अहवालानुसार, जम्मू काश्मीर विधानसभेच्या जागेत वाढ होणार आहे. या बरोबर काश्मिरी पंडीत आणि अनुसूचित जनजातीसाठी आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. सर्व विधानसभांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. आता विधानसभेच्या एकूण जागा या ४७ असतील, पूर्वी त्या ४६ होत्या.

कुपवाडा जिल्ह्यात ही एक जागा वाढविण्यात आली आहे. या जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण सहा जागा असतील. अनंतनाग जिल्ह्यात एक जागा आहे. यात सात विधानसभेचे क्षेत्र असतील. या जिल्ह्यात पूर्वी या विधानसभेच्या सहा जागा होत्या. आता ही संख्या सात झाली आहे. कुलगाम जिल्ह्यात तीन जागा असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com