Mukul Wasnik news : केरळमध्ये कोण मुख्यमंत्री? मुकुल वासनिक यांच्या हातातील यादी व्हायरल

KC Venugopal news, VD Satheesan latest news : मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी आपला अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविला असल्याचे वृत्त आहे.
Mukul Wasnik during a media interaction amid the Kerala Congress leadership discussions. The alleged leak of MLA signatures has fueled speculation over support for K. C. Venugopal.
Mukul Wasnik during a media interaction amid the Kerala Congress leadership discussions. The alleged leak of MLA signatures has fueled speculation over support for K. C. Venugopal.Sarkarnama
Published on
Updated on

Kerala Congress controversy : डाव्या पक्षांना पराभूत करत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने केरळ विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठला आहे. आता राज्याचे नेतृत्व कोण करणार, यावरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्साखेच सुरू आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक आणि अजय माकन यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी गुरूवारी आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर वासनिक यांच्या हातातील आमदारांच्या यादीचा फोटो व्हायरल झाला आहे.

तिरुवनंतपुरममधील इंदिरा भवनमध्ये वासनिक आणि माकन यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीत प्रत्येक आमदाराला त्यांची पसंती विचारण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्रि‍पदासाठीच्या रेसमधील नेत्यांची नावे संबंधित आमदाराच्या नावासमोर लिहिली जात होती. त्याच यादीतील काही आमदारांनी दिलेली पसंतीचा कागद व्हायरल झाला आहे.

मुकुल वासनिक यांनी मात्र सर्व दावे फेटाळून लावले आहेत. व्हायरल यादी सत्यावर आधारित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या यादीतील बहुतेक आमदारांच्या नावासमोर खासदार के. सी. वेणुगोपाल यांचे नाव आहे. पक्षातील ६३ पैकी ४० हून अधिक आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांनीही वेणुगोपाल यांना समर्थन दिल्याचे व्हायरल झालेल्या यादीतून दिसते.

Mukul Wasnik during a media interaction amid the Kerala Congress leadership discussions. The alleged leak of MLA signatures has fueled speculation over support for K. C. Venugopal.
Governor Rajendra Arlekar : तमिळनाडूत 'DMK-AIADMK'ची सत्ता? राज्यपालांनी सर्व चर्चांवर थेट उत्तर देत वाढविली धाकधूक...

वेणुगोपाल हे गांधी कुटुंबाचे विश्वासू मानले जातात. केरळ विजयासाठी पक्षाने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. त्यामुळे सध्या तेच मुख्यमंत्रि‍पदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांच्या नावाचाही काही आमदारांनी आग्रह धरला आहे. विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांच्या नावाचीही चर्चा आहे.

Mukul Wasnik during a media interaction amid the Kerala Congress leadership discussions. The alleged leak of MLA signatures has fueled speculation over support for K. C. Venugopal.
Tamil Nadu crisis : विजय यांना पाठिंब्यासाठी आग्रह धरणाऱ्या AIADMK खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; सुमारे 25 आमदारांचे आहे समर्थन

दरम्यान, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी आपला अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता केरळ मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णयावर पक्षश्रेष्ठींची अंतिम मोहोर उमटल्यानंतरच नाव जाहीर होईल. पण त्याआधीच राज्यात फ्लेक्सबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वादही चव्हाट्यावर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com