

Kerala Congress MLA news : केरळच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप हे केरळच्या कोल्लमच्या नवनिर्वाचित आमदार बिंदू कृष्णा यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहेत.
महिला आमदार बिंदू कृष्णा त्यांना रोखलं. समोरून येताना, आमदार बिंदू कृष्णा यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला होता. पण चेरियम फिलिप यांनी त्यांना मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओ व्हायरल नंतर, चेरियम फिलिप यांच्या कृतीवर जोरदार चर्चा होत आहे.
केरळ इथं सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने (Congress) आघाडीला इथं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यासाठी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती. याच बैठकी दरम्यान, या प्रकाराला आमदार बिंदू कृष्णा यांना समोरं जावं लागलं.
या बैठकीला काँग्रेसचे आमदार प्रदेश कार्यालयात येत असताना, त्यांचे नेते स्वागत करण्यासाठी उभे होते. त्यात चेरियम फिलिप देखील सर्वात पुढे होते. महिला (Women) आमदार बिंदू कृष्णा या प्रवेशद्वारातून येताच, त्यांनी तिथं कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.
यानंतर हस्तांदोलन करत पुढे सरकल्या. चेरियम फिलिप समोर उभे होते. त्यावेळी बिंदू कृष्णा यांनी त्यांच्याशी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. पण, चेरियम फिलिप यांनी त्यांचा हात बाजूला करत त्यांना मिठी मारायचा प्रयत्न केला.
आमदार बिंदू कृष्णा यांनी त्यांना बाजूला सारले. पण चेरियम फिलिप हे मिठी मारण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न केला. या वेळी आमदार बिंदू कृष्णा यांनी हात जोडले, अन् पुढे निघून गेल्या. विशेष बाब म्हणजे, पक्षाचे नेते आणि पत्रकार तिथं उपस्थित होते. त्यावेळी हा प्रकार झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
चेरियम फिलिप यांच्या या कृतीमुळे बिंदू कृष्णा या काहीशा अस्वस्थ झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. बिंदू कृष्णा यांनी चेरियम फिलिप यांना मागे ढकलेले देखील व्हिडिओत दिसते. या प्रकारावेळी तिथं उपस्थित असलेल्या काहींमध्ये हासताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीने वैयक्तिक सीमांचा बाळगल्या पाहिजेत, अशा शब्दांमध्ये सोशल मिडिया वापरकर्त्यांनी सुनावलं आहे. दरम्यान, चेरियन फिलिप आणि बिंदू कृष्णा यांपैकी कोणीही या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया किंवा निवेदन दिलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.