

Kolkata News: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील विमानतळावर सुदैवानं एक विमान अपघाताची धक्कादायक घटना समोर येत आहे. इंडिगो कंपनीच्या एका विमानाचे इंजिन बंद पडल्याची घटना समोर आली आहे. इंडिगो कंपनीचे फ्लाइट क्रमांक 6E 7423 सोमवारी (ता. कोलकात्याहून शिलाँगला जाणार होते. प्रवासी विमानात बसल्यानंतर विमान पार्किंग बे मधून धावपट्टीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले. मात्र,याचदरम्यान टॅक्सिंग करताना विमानाचं इंजिन अचानक त्याचं इंजिन बंद पडल्याचं समोर आलं आहे.
विशेष म्हणजे कोलकात्याहून शिलाँगच्या दिशेनं निघालेल्या इंडिगोच्या याच विमानात DMK चे खासदार पी.विल्सन यांच्यासह अन्य तीन खासदार आणि 67 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेमुळे प्रवाशांना सुमारे दोन तास विमानातच थांबावे लागले. त्यानंतर ही विमानसेवा रद्द करण्यात आली. पी. विल्सन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या X वर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, IndiGo चे फ्लाइट क्रमांक 6E 7423 सोमवारी कोलकात्याहून शिलाँगला जाणार होते. प्रवासी विमानात बसल्यानंतर विमान पार्किंग बे मधून धावपट्टीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले. मात्र, याचदरम्यान टॅक्सींग करताना विमान अचानक थांबले.
खासदार पी. विल्सन यांच्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच त्याचे एक इंजिन निकामी झाले आणि ते बंद करावे लागले. त्यानंतर विमानातील प्रवाशांना सुमारे दोन तास विमानाच्या आतच थांबावं लागलं. काही वेळाने वैमानिकाने प्रवाशांना तांत्रिक बिघाडाची माहिती दिली आणि विमानाचे उड्डाण रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
या विमानातून DMK चे राज्यसभा खासदार पी. विल्सन प्रवास करत होते. त्यांच्यासोबत अन्य तीन खासदारही शिलाँगला जात होते. या सर्वांना संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) सार्वजनिक सुनावणीत सहभागी व्हायचे होते.
डीएमकेचे राज्यसभा खासदार पी. विल्सन यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून संबंधित घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी विमानात त्यांच्यासह अन्य तीन खासदार आणि 67 प्रवासी होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सर्वांना सुमारे दोन तास विमानातच थांबावे लागले. त्यानंतर वैमानिकाने तांत्रिक बिघाडाचे कारण देत विमानाचे उड्डाण रद्द केल्याचं समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.