Fake Certificate Case : सरकारी नोकरीसाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर? KPSC अध्यक्षांच्या मुलीवर गुन्हा दाखल

Karnataka KPSC Chairman Daughter Booked in Certificate Fraud Case : कर्नाटकात गेल्या वर्षी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या शैक्षणिक मार्कशीटचा वापर करून तब्बल ४० वर्षे 'विद्युत मंडळात' नोकरी केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते.
Fake Certificate Case
Fake Certificate CaseSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटक राज्याच्या बंगळूरमध्ये जवळपास चाळीस वर्षांनंतर नोकरीत बनावटगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या शैक्षणिक मार्कशीटचा वापर करून 'विद्युत मंडळात' नोकरी केल्याचे उघकीस आले होते. ज्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता अशाच पद्धतीने सरकारी नोकरीसाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा थेट कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) अध्यक्ष शिवशंकरप्पा यांच्या कन्या सुमा एस. साहुकार यांच्याविरोधात दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पा यांच्या कन्या सुमा एस. साहुकार यांच्याविरोधात बंगळुरातील विधानसौध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक विस्तार अधिकारी पदासाठी अर्ज करताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.

यावरून आता कर्नाटकात जोरदार वाद सुरू झाला असून या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, केपीएससी ही घटनात्मक संस्था असल्याने कायद्याच्या चौकटीत राहूनच या प्रकरणाचा विचार केला जाईल. सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी झाल्यानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होईल, असे स्पष्ट केले.

Fake Certificate Case
Fraud Case : राजकारणात खळबळ! जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून मोठा घोटाळा, भाजपमधून हकालपट्टी झालेल्या बड्या नेत्याना अटक

या प्रकरणामुळे केपीएससीची भरती प्रक्रिया थांबविण्यात येणार नाही. ती पूर्ववत सुरू राहील. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियमावली येत्या आठ ते दहा दिवसांत तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Fake Certificate Case
Shiv Sena Leader Fraud Case : एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा कारनामा; तीन मृत व्यक्ती जिवंत दाखवत जमीन लाटली, पोलिसही चक्रावले

दरम्यान, तक्रारीनुसार सुमा एस. साहुकार यांनी अर्जामध्ये आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न केवळ ४० हजार रुपये असल्याचे नमूद केले होते. मात्र, त्यांचे वडील शिवशंकरप्पा यांचा मासिक पगारच सुमारे २ लाख २५ हजार रुपये आहे. त्यामुळे उत्पन्नाचा तपशील दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे सादर करून आरक्षणाचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विधानसौध पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com