Ladakh Violence: नेपाळप्रमाणं लडाखमध्ये Gen Z उतरले रस्त्यावर! 4 जणांचा मृत्यू, 30 जखमी; भाजपचं कार्यालय पेटवलं

Ladakh Violence: आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर मुख्य आंदोलक सोनम वांगचूक यांनी पंधरा दिवसांच्या उपोषणानंतर आपलं उपोषण स्थगित केलं तसंच तत्काळ हिंसा थांबवावी असं आवाहनही केलं.
Sarkarnama News
Sarkarnama News
Published on
Updated on

Ladakh Violence: नेपाळप्रमाणं लडाखमध्ये देखील Gen Z रस्त्यावर उतरले असून विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर काही तरुणांनी लडाखमधील भाजपचं कार्यालयचं पेटवून दिलं. त्याचबरोबर या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले आहेत. आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर मुख्य आंदोलक सोनम वांगचूक यांनी पंधरा दिवसांच्या उपोषणानंतर आपलं उपोषण स्थगित केलं. तसंच तत्काळ हिंसा थांबवावी असं आवाहन करताना यामुळं आपल्या मुख्य हेतूचं नुकसान होईल. परिस्थिती आणखी बिघडावी अशी आपली इच्छा नाही, असंही त्यांनी आंदोलक तरुणांना आवाहन केलं आहे.

Sarkarnama News
Dharashiv Flood: शिवसेनेकडून आलेले मदतीचे टेम्पो ग्रामस्थांनी परत पाठवले! संतप्त नागरिक नेमकं काय म्हणालेत? जाणून घ्या

वांगचूक यांचं आंदोलकांना आवाहन

वांगचूक यांनी आपलं आंदोलन स्थगित करताना एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यात ते म्हणतात, आज आपल्या १५ दिवसांच्या उपोषणावर मला हे सांगताना आतिव दुःख होतंय की, लेह शहरात मोठ्या प्रमाणावर हिंसा आणि तोडफोड झाली. अनेक कार्यालये आणि पोलिसांची वाहन पेटवून देण्यात आली. काल जे लोक ३५ दिवसांपासून इथं उपोषण करत होते त्यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना या स्थितीत रुग्णालयात भरती करावं लागलं. यामुळं तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर राग उफाळून आला आणि आज त्यांनी संपूर्ण लेह बंदची घोषणा केली.

Sarkarnama News
Railway Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून बोनसची घोषणा; 10 लाख 90 हजार कर्मचाऱ्यांना होणार फायदा

हजारोंच्या संख्येनं तरुण मंडळी रस्त्यांवर होती. यांपैकी काही लोक स्वतःला आमचे समर्थक सांगतात पण संपूर्ण लेहच आमचा समर्थक आहे. पण ही एक Gen Z क्रांती होती. ही तरुण मंडळी गेल्या पाच वर्षांपासून बेरोजगार आहे. त्यांना नोकऱ्यांवरुन काढून टाकण्यात आलं आहे. मी कायम म्हटलंय की, हेच सामाजिक अशांततेचं कारण आहे. यामध्ये तरुणांना बेरोजगार ठेवायचं आणि त्यांचे लोकशाही अधिकार हिसकावून घेतल्यामुळं हे होतंय.

Sarkarnama News
Eknath Shinde: "लय देवानं परेशान केलंय...." धाराशिवच्या शेतकऱ्यांची हतबलता! पुराच्या पाहणीसाठी गेलेल्या एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांनी घेरलं

दरम्यान, हे आंदोलन सहाव्या अनुसुचीचा विस्तार व्हावा आणि त्याचबरोबर लडाखला राज्याचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा पुढे नेण्यासाठी करण्यात आलं होतं. केंद्र सरकार आणि लडाखच्या प्रतिनिधींमध्ये सहा ऑक्टोबरला पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. यामध्ये लेह अपेक्स बॉडी (एलएबी) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्सचे (केडीए) सदस्य देखील सामील होतील. एलएबीच्या युवा शाखेनं निषेध आंदोलन आणि बंदचं आवाहन केलं होतं. कारण १० ऑगस्टपासून ३५ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या १५ लोकांची प्रकृती मंगळवारी बिघडली त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com