लालू प्रसाद यादवांचा नवा घोटाळा; बिहारच्या १५ ठिकाणांवर सीबीआय'ची छापेमारी

Lalu Prasad Yadav Corruption News| चारा घोटाळा प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना गेल्या महिन्यात २२ तारखेला जामीन मंजूर केला.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavTwitter/@ANI
Published on
Updated on

Lalu Prasad Yadav latest news

पटना, बिहार : केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (CBI) बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (lalu Prasad Yadav) यांच्या 17ठिकाणांवर छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांच्यावर रेल्वे भरती घोटाळ्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महागड्या जमिनींच्या बदल्यात नोकरी देण्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव केंद्रीय मंत्री असताना खूप महागड्या जमिनी घेऊन अनेकांना नोकऱ्या दिल्या होत्या. लालू यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री होते. लालू प्रसाद यादव आणि त्यांची कन्या मीसा भारती यांच्या विरोधात सीबीआयने त्यांच्या कार्यकाळात भरतीमध्ये कथित अनियमितता केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे, त्याच प्रकरणी सीबीआयचे पथक कारवाई करत आहे.

Lalu Prasad Yadav
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी मोदींना साकडे; कंचन गिरींनी लिहिले पत्र!

सीबीआयने शुक्रवारी सकाळीच कारवाईला सुरुवात केली. याशिवाय सीबीआयचे पथक लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मीसा भारती यांच्या पाटणा, गोपालगंज आणि दिल्लीतील 17 ठिकाणांवर कारवाई सुरु केली. सीबीआयचे पथक बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही चौकशी करत आहे.

दरम्यान, चारा घोटाळा प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना गेल्या महिन्यात २२ तारखेला जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी काही दिवस एम्समध्ये उपचार घेतले, त्यानंतर ते त्यांची मोठी मुलगी मीसा भारतीच्या घरीच आहेत. सुनावणीपूर्वीच प्रकृती खालावल्याने लालूंना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली एम्समध्ये आणण्यात आल्याची माहिती होते. तपासणीनंतर, एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना रांचीच्या रिम्समध्ये उपचार घेण्यास सांगितले, उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com