Uttar Pradesh News : भाजपने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) सर्व 80 जागा जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. पण राज्यातील काही मतदारसंघ पक्षासह उमेदवारांचीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे सुलतानपूर. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. एकाही नेत्याला या मतदारसंघात दुसऱ्यांदा संधी मिळालेली नाही. भाजपने या वेळी मनेका गांधींना पुन्हा उमेदवारी देत त्यांचे टेन्शन वाढवले आहे.
मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी 2019 च्या निवडणुकीत सुलतानपूरमधून निसटता विजय मिळवला होता. त्यांना 4 लाख 59 हजार मते मिळाली होती, तर बसपाच्या उमेदवाराने 4 लाख 44 हजार मते मिळवली होती. त्यामुळे केवळ 16 हजार मतांनी त्यांनी विजय मिळाला होता. आता पक्षाने पुन्हा त्यांनाच तिकीट दिले आहे. आजपासून त्यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे.
मतदारसंघाविषयी बोलताना मनेका गांधी यांनी म्हटले आहे की, माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्यामुळे मला कुठून तिकीट मिळणार, पिलिभित की सुलतानपूर (Sultanpur), याबाबत संभ्रम होता. आता पक्षाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी आभारी आहे. मी सुलतानपूरमध्ये परत आल्याचा मला आनंद आहे. कारण या मतदारसंघाचा एक इतिहास आहे. कोणताही खासदार पुन्हा निवडून येत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनेका गांधी यांनीच या मतदारसंघाचा इतिहास सांगितल्याने त्यांच्यासह भाजपलाही (BJP) धाकधूक असेल. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपने वरुण गांधींना तिकीट दिले होते. ते निवडूनही आले होते. पण 2019 मध्ये त्यांनी पिलिभितमधून, तर मनेका गांधींनी सुलतानपूरमधून निवडणूक लढवली होती.
वरुण गांधींविषयी म्हणाल्या...
वरुण गांधी (Varun Gandhi) यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आता ते पुढे काय भूमिका घेणार यावर बोलताना मनेका गांधी म्हणाल्या, त्यांना काय करायचे आहे, ते त्यांनाच विचारा. निवडणुकीनंतर आम्ही त्याबाबत विचार करू. त्याला अजून वेळ आहे, असे म्हणत मनेका गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.