Lok Sabha seats : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 816 पर्यंत वाढणार, सरकारचा प्लॅन तयार; 2011 ची जनगणनाच ठरणार गेमचेंजर

India parliament expansion news : सरकारकडून याची तयारी सुरू करण्यात आली आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे.
PM Narendra Modi Lok Sabha
PM Narendra Modi Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

Women reservation bill 33 percent : मोदी सरकारकडून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी मोठे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. सरकार नारी शक्ती वंदन सुधारित अधिनियम विधेयक संसदेत आणणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी २०११ मध्ये झालेली जनगणना गेमचेंजर ठरणार आहे.

सरकारने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी विशेष अधिवेशन बोलवत महिला आरक्षणाचा विधेयक पारित केले होते. मात्र, या विधेयकामध्ये नव्या जनगणनेनंतर आरक्षण लागू होईल, अशी तरतूद आहे. मात्र, नवी जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना होण्यास बराच कालावधी लागू शकतो. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत हे आरक्षण लागू होण्याची शक्यता धूसर आहे.

यापार्श्वभूमीवर सरकारकडून विधेयकामध्ये सुधारणा करून सुधारित विधेयक आणले जाणार असल्याची चर्चा आहे. या विधेयकामध्ये आरक्षणासाठी मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी २०११ ची जनणना ग्राह्य धरण्याची तरतूद असेल. असे झाल्यास लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांवरून हा आकडा ८१६ पर्यंत वाढेल. त्यामध्ये महिलांसाठी २७३ जागा आरक्षित असतील.

PM Narendra Modi Lok Sabha
Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; IPS सातपुतेंनी जारी केले 2 मोबाईल क्रमांक अन् 3 पोलीस अधिकाऱ्यांची नावे...

२०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पुनर्रचना करण्याचा निर्णय झाल्यास आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण लागू होईल. त्याचप्रमाणे हे विधेयक पारित झाल्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये विविध राज्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल. यादृष्टीने सरकारने तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.

PM Narendra Modi Lok Sabha
PM Modi on Iran War : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती; म्हणाले, कोरोनासारखी एकजूट, आता पुन्हा सज्ज राहण्याची आवश्यकता...

सरकारकडून याची तयारी सुरू करण्यात आली आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करत असल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. सुरूवातीला छोट्या पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केली जात आहे. टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय पक्षांशी चर्चा केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच हे विधेयक संसदेत येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com