

कर्नाटकच्या राजकारणात मोठी घडामोड घडत आहे. मुख्यमंत्री पदावर बदल होण्याच्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे नाव निश्चित झाले आहे. काँग्रेसमधील प्रभावशाली आणि संकटमोचक नेता म्हणून ओळख असलेले डीके शिवकुमार लवकरच राज्याची धुरा सांभाळणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद होणार आहे. संपत्तीच्या बाबतीत डीके शिवकुमार यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांना देखील मागे टाकले आहे.
2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, डीके शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल 1413 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये त्यांची संपत्ती 840.08 कोटी रुपये होती. अवघ्या 5 वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
त्यांच्या नावावर 273.42 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून 1140.36 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती आहे. यातील जवळपास 972.65 कोटी रुपयांची मालमत्ता थेट त्यांच्या नावावर नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे त्यांच्यावर सुमारे 263 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
डीके शिवकुमार यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा बंगळुरूमधील रिअल इस्टेट प्रकल्पांशी जोडलेला आहे. ‘दावनम कन्स्ट्रक्शन्स’ आणि संबंधित कंपन्यांमधून त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. राजाजीनगरमधील ग्लोबल मॉल आणि म्हैसूर रोडवरील ग्लोबल डिव्हिनिटी मॉल हे त्यांच्या प्रमुख प्रकल्पांपैकी मानले जातात. याशिवाय बांधकाम, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, मीडिया आणि कृषी क्षेत्रातही त्यांची गुंतवणूक असल्याचे सांगितले जाते.
महागडी रोलेक्स आणि हुब्लॉट घड्याळे, सोने-चांदीचा मोठा साठा यामुळेही त्यांची जीवनशैली चर्चेत असते. मात्र एवढ्या मोठ्या संपत्तीनंतरही त्यांच्या नावावर फक्त Toyota Qualis ही एकच कार असल्याचे समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.