BJP News: कॅबिनेट मंत्री अन् भाजप नेत्याचं स्वपक्षीय महिला नगरसेविकेविषयी भरकार्यक्रमातच वादग्रस्त विधान; व्हिडीओ व्हायरल

Madhya Pradesh Politics: भाजपच्या विद्यमान नगरसेविका संध्या यादव या इंदूरमधील एका कार्यक्रमासाठी माईकजवळ जात असतानाच भाजपचे कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या शारीरिक टिप्पण्णीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Kailash Vijayvargiya
Kailash VijayvargiyaSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी महिला नगरसेविकेबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे चौफेर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विजयवर्गीयांनी शरीरयष्टीवर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

इंदूरमध्ये पायाभूत सुविधा विकासाच्या कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या कैलाश विजयवर्गीय यांनी भाजपच्या प्रभाग नगरसेविका संध्या यादव यांच्याबाबत सार्वजनिकरित्या टिप्पणी केली आहे.

भाजपच्या विद्यमान नगरसेविका संध्या यादव या इंदूरमधील एका कार्यक्रमासाठी माईकजवळ जात असतानाच भाजपचे कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या शारीरिक टिप्पण्णीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मंंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी हिंदीतून"संध्यादीदी की भी चौड़ाई बढ़ गई है थोड़ी सी... म्हणजेच संध्या दीदींचीही रुंदी थोडी वाढली आहे. या वक्तव्यावरून विजयवर्गीय यांच्यावर टीका होत असून, त्यांच्या वक्तव्याला शरीरयष्टीवर टिप्पणी करणारे आणि आक्षेपार्ह असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

Kailash Vijayvargiya
Maharashtra Drought : मोठी बातमी! राज्यात अखेर दुष्काळ घोषित होणार? पावसाची मोठी तूट; प्रशासनाकडून वेगाने हालचाली सुरू!

विरोधकांकडून माफीची मागणी

मध्य प्रदेश काँग्रेसने विजयवर्गीय यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. काँग्रेस नेत्यांनी हे वक्तव्य लैंगिक भेदभाव करणारे आणि अवमानकारक असल्याचा आरोप करत सार्वजनिक माफीची मागणी केली आहे. काही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून विजयवर्गीय यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेतले आहेत.

Kailash Vijayvargiya
Mira Bhayandar News: भाजपमधून बंडखोरी, 5 वर्षांत तीन सरकारांना जाहीर पाठिंबा, माजी महिला आमदारांनं घेतली CM फडणवीसांची तडकाफडकी भेट

महिलांच्या कपड्यांवर वक्तव्य:

कैलाश विजयवर्गीय यांनी यापूर्वी महिलांच्या तोकड्या कपड्यांची तुलना रामायणातील पौराणिक पात्र असलेल्या शूर्पणखेशी केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. तसेच त्यांनी इंदूरमध्ये दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत झालेल्या विनयभंगाच्या घटनेवर केलेल्या वक्तव्यामुळेही ते वादात सापडले होते. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ पीडित महिलांनाच दोष देणारा असल्याची टीका झाली होती.

मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री व भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकारांबाबत पत्रकारांशी बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तसेच त्यांच्या घरातील काही कामगार केवळ पोहे खात असल्याने ते 'बांगलादेशी' असल्याचे वक्तव्य केल्यामुळेही विजयवर्गीय चर्चेत आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com