ShivrajSingh Chouhan : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांचा चक्क 'वडापाव'वर ताव!

ShivrajSingh Chouhan : वंजारवाडी येथील उसाचा रसाचा ही आस्वाद घेतला.
ShivrajSingh Chouhan
ShivrajSingh ChouhanSarkarnama

सोनई : मध्यप्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (ShivrajSingh Chouhan) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नव्या वर्षाचं औचित्य साधत त्यांनी आपल्या कुटुंबासह शनिशिंगणापूर (Shanishinganapur) देवस्थानाचे मनोभावे दर्शन घेतले.

शिर्डीला जाताना त्यांना महाराष्ट्राचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ वडापाव व तसेच, वंजारवाडी येथील उसाचा रसाचा आस्वाद घेतला.मात्र यावेळी कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी झाल्याने, गर्दी सावरण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस व यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.

ShivrajSingh Chouhan
Demonetisation : '' सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर; पण मग काळा पैसा कुठे गायब झाला?" राष्ट्रवादीचा सवाल

शिवराजसिंह चव्हाण दरवर्षी शनिशिंगणापूरच्या दर्शनासाठी येत असतात. १ जानेवारीला चौहान नियमितपणे शनिशिंगणापूरला येत असतात. रविवारी सायंकाळी त्यांनी उदासी महाराज मठात अभिषेक विधी केला, मनोभावे दर्शन घेतले. देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बनकर यांना यावेळी चौहान यांचा सत्कार केला. याप्रसंगी दीपक दरंदले, बाळासाहेब बोरूडे, माजी विश्वस्त योगश बनकर,सहाय्यक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे उपस्थित होते. येथील दर्शनाने कामकरण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळते असे यावेळी चौहान म्हणाले.

ShivrajSingh Chouhan
Ashish Shelar: '' महाराष्ट्राच्या इतिहासाशी फितुरी करणारा व्यक्ती...''; आशिष शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

शिर्डीला जाताना चौहान व त्यांच्या परिवाराने अशोक वडापावाच्या गाडीवर अचानके थांबले. यावेळी त्यांनी वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला. यावेळीअशोक कुसळकर आणि संदीप कुसळकर यांनी मुख्यमंत्र्याचा सत्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com