Thaimaman Scheme : CM विजय यांची मोठी घोषणा! सरकारी रुग्णालयात बाळ जन्मल्यास आईला सोन्याची अंगठी भेट; 'थाईमामम स्कीम' नेमकी काय?

Thaimaman Scheme : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी करुर इथं घोषणा केली की, थाईमामन गोल्ड रिंग योजना १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरु होईल.
CM Vijay
CM Vijay Sarkarnama
Published on
Updated on

Thaimaman Scheme : तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली. सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळाच्या आईला तामिळनाडूच्या परंपरेप्रमाणं एक खास गिफ्ट देण्यात येणार आहे. यामध्ये सोन्याच्या अंगठीचा समावेश असणार आहे. या योजनेला थाईमामम स्कीम असं नाव देण्यात आलं आहे. देशात-महाराष्ट्रात ज्या प्रकारे लोकप्रिय घोषणा केल्या जातात त्याच प्रकारची ही योजना असल्याचं बोललं जात आहे.

CM Vijay
Shivsena UBT : ठाकरेंचे नगरसेवक फोडायला नेमले एजंट! दिली जातेय ५ कोटींची ऑफर; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे धक्कादायक आरोप

करुर इथं गेल्यावर्षी विजय यांच्याच एका रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या कुटुंबियांची आज विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून भेट घेतली. यानंतर एटलस एरिनामध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ३२ कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं. यावेळी त्यांनी बहुप्रतिक्षित थाईमामन गोल्ड रिंग योजनेच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, थाईमामन गोल्ड रिंग योजनेची सुरुवात सी. एन. अण्णादुरई यांच्या जयंतीच्या निमित्त १५ सप्टेंबर २०२६ रोजी सुरु केली जाणार आहे.

CM Vijay
Ashadhi Wari : पुण्यात मुक्कामी वारकऱ्यांचे साहित्य शाळेतून बाहेर फेकले, पाण्याविना घसाही कोरडा : महापालिकेच्या कारभारामुळे अतोनात हाल

थाईमामन गोल्ड रिंग योजना काय?

थाईमामन गोल्ड रिंग हे तामिळनाडू सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेचा शुभारंभ १५ सप्टेंबर २०२६ला सी. एन. अण्णादुरई यांच्या जयंतीवर सुरुवात होणार आहे. २२ जून २०२६ नंतर तामिळनाडूच्या सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत अशा सरकारी दवाखान्यात जन्म घोणाऱ्या कोणत्याही बाळाच्या आईला एक ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाणार आहे. ही भेट त्या आईप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी असेल.

CM Vijay
Beed: बजरंग सोनवणेंच्या मुलाच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढला : संतप्त घुले कुटुंबीय केजच्या रस्त्यावर

नवाज बाळांना पारंपारिक 'थाईमामन सीर'च्या परंपरेनुसार (मामाद्वारे दिली जाणारी भेट) स्वागत करण्याच्या उद्देशानं ही भेट दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मातृ आणि बाल कल्याण चांगल करण्यासाठी या महत्वाकांक्षी योजनेवर राज्य सरकार प्रत्येक वर्षी ७५५.८३ कोटी रुपये खर्च करेल. सरकारचं म्हणणं आहे की, ही योजना 'वेत्री तामिळनाडू' व्हिजन कार्यक्रमांतर्गत लोकांच्या सरकारी आरोग्य सेवांवरील विश्वास अधिक वाढवण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com