Shivsena UBT : ठाकरेंचे नगरसेवक फोडायला नेमले एजंट! दिली जातेय ५ कोटींची ऑफर; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे धक्कादायक आरोप

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे ६ खासदार नुकतेच फुटले आणि त्यांनी शिंदेकडं असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवकही फोडण्याची चर्चा सुरु झाली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : उद्धव ठाकरेंचे ६ खासदार नुकतेच फुटले आणि त्यांनी शिंदेकडं असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवकही फोडण्याची चर्चा सुरु झाली आहे. याच कटाचा भाग म्हणून या नगरसेवकांना मॅनेज करण्यासाठी चक्क एजंट नेमण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या एजंटांच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांची ऑफरही देण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरेंच्या एका पदाधिकाऱ्यानं केला आहे.

Uddhav Thackeray
Solapur DCC Bank : सोलापूर DCC बॅंकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार; निवडणूक प्राधिकरणाचा मतदारयादीबाबत मोठा निर्णय

नाशिक महापालिकेतील गटनेते केशव पोरजे यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत यामध्ये हे धक्कादायक आरोप आणि खुलासे केले आहेत. पोरजे यांनी म्हटलं की, कुठलाही नगरसेवक फुटणार नाही. काल देखील आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आम्ही १३ नगरसेवक हजर होतो. एकही नगरसेवक फुटणार नाही, शिंदेसेनेत जाणार नाही. या फक्त अफवा असून शिंदे सेनेकडून अफवा पसरवल्या जात आहेत.

Uddhav Thackeray
ATS Raid : ATS ची महाराष्ट्रात मोठी कारवाई! छत्रपती संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांत छापे, पाकिस्तान कनेक्शन असणारे 6 जण ताब्यात

पण या चर्चांमुळं एकमेकांकडं संशयाच्या नजरेनं पाहण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या काही नेत्यांना सांगितलं गेलं आहे की, तुम्ही ठाकरेंचे नगरसेवक घेऊन या आपल्याकडं तुम्हाला उपमहापौर करतो. आमचे नगरसेवक फोडायला एजंट नेमले गेले आहेत. यासाठी नगरसेवकांना 5 कोटींचं आमिष दाखवलं जातं आहे. यासाठी 5 ते 6 नगरसेवकांना संपर्क साधण्यात आला आहे. जे कोणी सोडून जातील त्यांना अपात्र केलं जाईल, पण कोणीही सोडून जाणार नाही. पण असं काही झालंच तर ऑपरेशन तुडवाचे पडसाद नाशिकमध्ये बघायला मिळतील, असंही पोरजे यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray
Rain Deaths 2026 : राज्यात पावसाचा कहर; 63 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत

या फोडाफोडीच्या राजकारणासाठी आम्हाला विकासनिधी दिला जात नाही. उद्या संपर्कप्रमुख रविंद्र मिर्लेकर नाशिकला येतील. संजय राऊत पण दोन दिवसांत येणार आहेत. आम्ही देखील सर्व पक्ष प्रमुखांची भेट घेऊ, असं यावेळी केशव पोरजे यांनी पत्रकार परिषदेस सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com