Bulldozer Action : अधिवेशनापूर्वी राजकारण तापले! TMC बंडखोर खासदारांबाबत बिर्लांचा मोठा निर्णय, अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर ‘बुलडोझर’

Abhishek Banerjee Office Demolished In West Bengal : देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. पण त्याआधीच पश्चिम बंगालमधील राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे.
Abhishek Banerjee office demolition news
Abhishek Banerjee office demolition newssarkarnama
Published on
Updated on

West Bengal Politics : संसदेच्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी नवी दिल्लीसह पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्यास अधिकृत मान्यता दिली. तर तृणमूल काँग्रेसमधील वीस खासदारांच्या बंडावर आज (रविवारी) निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या बंडखोर खासदारांना सभागृहात वेगळी आसनव्यवस्था मिळणार आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे आमतला येथील जनसंपर्क कार्यालय जिल्हा प्रशासनाने शनिवारी जमीनदोस्त केले. हे कार्यालय अधिकृत बांधकाम आराखड्याशिवाय आणि नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही बुलडोझर कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईनंतर भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोष करून घोषणाबाजी केली.

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे आमतला येथील जनसंपर्क कार्यालय दक्षिण २४ परगणा जिल्हा प्रशासनाने शनिवारी जमीनदोस्त केले. हे कार्यालय अधिकृत बांधकाम आराखड्याशिवाय आणि नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही बुलडोझर कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईनंतर भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोष करून घोषणाबाजी केली. पोलिस आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या बंदोबस्तात शनिवारी सकाळी ही मोहीम सुरू करण्यात आली.

Abhishek Banerjee office demolition news
Bulldozer Action : मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरला, आता आणखी पंचवीस नगरसेवकांवरही टांगती तलवार?

दुपारी बाराच्या सुमारास तीन बुलडोझरच्या साह्याने कार्यालयाचा समोरील भाग आणि शेड पाडण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी तैनात होते. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ‘‘प्रशासनाने कायद्यानुसार आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनच हे पाऊल उचलले आहे. ही कारवाई केवळ बांधकामाच्या नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित असून, त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही,’’ असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाईदरम्यान पोलिसांनी इमारतीतून कम्प्युटर, लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणात फाइल जप्त केल्या आहेत.

TMCचे लोकसभेत २८ खासदार

दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्यास अधिकृत मान्यता दिली. मात्र, तृणमूल काँग्रेसमधील वीस खासदारांच्या बंडावर निर्णय प्रलंबित ठेवताना सभागृहात वेगळी आसनव्यवस्था करण्याची त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या वीस खासदारांनी ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ नावाच्या पक्षामध्ये विलीन होण्याची केली होती. ही मागणी तूर्त प्रलंबित ठेवली आहे. लोकसभेतील शनिवारच्या पक्षनिहाय यादीनुसार अभिषेक बॅनर्जी गटनेते असलेल्या तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत २८ खासदार असल्याचे दाखविण्यात आले आहे.

Abhishek Banerjee office demolition news
Bulldozer Action : महापालिकेचा एमआयएमला झटका! मतीन पटेलचे नगरसेवक पद जाणार? बुलडोझरही चालणार; महापौरांच्या इशाऱ्याने खळबळ

ठाकरेंच्या शिवसेनेचे संख्याबळ तीन

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ओम राजेनिंबाळकर, संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लोकसभाध्यक्ष बिर्ला यांच्याकडे करण्यात आली होती. आता त्याला मंजुरी मिळाल्यामुळे लोकसभेतील शिवसेनेचे संख्याबळ तेरा एवढे झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सोळा खासदार असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या ‘तेलुगू देसम’ पक्षापाठोपाठ शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष ठरला आहे. सहा खासदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संख्याबळ तीनवर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com