Rahul Gandhi : ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या पंतप्रधानांचा राहुल-प्रियंका गांधींसोबत ब्रेकफास्ट!

Malaysian Prime Minister met Rahul Gandhi : मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी नवी दिल्लीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासोबत ब्रेकफास्ट बैठक घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
Malaysian Prime Minister met Rahul Gandhi
Malaysian Prime Minister met Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Malaysian Prime Minister met Rahul Gandhi : १८ व्या ब्रिक्स परिषदेसाठी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम दिल्लीत उपस्थित होते. त्यांच्या या दौऱ्यात दोन घटना चर्चेचा विषय ठरल्या. आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासोबत त्यांची भेट झाली. यावेळी त्यांनी एकत्र नाश्ता करत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. तर दुसरीकडे ब्रिक्स शिखर परिषदेमधील स्नेहभोजनादरम्यान त्यांनी गायलेले भारतातील सुप्रसिद्ध गायकाचे गाणे, त्यांनी ते सोशल मिडियावर टाकल्यावर लोकांनी त्यांचे कौतुक केले.

पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सोबत नाश्ता करत आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक विकास मुद्दयांवर चर्चा केली. 'ब्रेकफास्टच्या निमित्ताने पुन्हा एकदा माझे मित्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली. आम्ही अलिकडील आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्दयांवर चर्चा केली'. असे व्टीट त्यांनी केले. तर शनिवारी रात्री त्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या नियोजित स्नेहभोजनानंतर पियानोवर किशोर कुमारचं 'ख्वाब हो तुम या कोई हकीकत' हे सुप्रसिद्ध गाणं गायलं. त्यांच्या गाण्याचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

मलेशिया हा ब्रिक्स परिषदेतील एक भागीदार देश आहे. आदल्या दिवशी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी व्यापार, सेमी कंडक्टर, पायाभूत सुविधा आणि संरक्षण यावर चर्चा केली होती. मोदींनी सोशल मिडीयावर पोस्ट करत याची माहिती दिली होती. त्यानंतर अन्वर इब्राहिम यांनी घेतलेली राहुल गांधीची भेट ही सध्या चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी पंतप्रधान मोदी आणि विरोधीपक्ष अशा दोन्ही टोकांशी संवादाच धोरण ठेवलं आहे.

Malaysian Prime Minister met Rahul Gandhi
Nashik News : नाशिकमधील खोदलेल्या रस्त्यांनी घेतला आणखी एक बळी, महापालिकेसमोर मृतदेह ठेवून नागरिकांचा ठिय्या

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची राहुल गांधी यांच्यासोबत तिसरी भेट आहे. २०१९ साली 'काँग्रेसचे' अध्यक्ष असताना तर २०२४ च्या भारताच्या दौऱ्यात ते राहुल गांधीना भेटले होते. त्यांनी गांधी कुटुंबाचा 'कौटुंबिक मित्र' म्हणून उल्लेख केला होता. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे सबंध आहेत.

Malaysian Prime Minister met Rahul Gandhi
Anganwadi News : मोठी बातमी! महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका-मदतनीसांना मिळणार ग्रॅच्युइटी? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com