

Anganwadi Gratuity News : राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान (ग्रॅच्युइटी) देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे आहे. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या ग्रॅच्युइटीचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. त्या एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९ व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभा वेळी बोलत होत्या.
‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या यंदाच्या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
तटकरे म्हणाल्या, पोषण माहाच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आहार व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मापासूनच योग्य पद्धतीने शिशु अभ्यंग मिळणे आवश्यक असून, त्यांचे महत्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. आयुषच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आवश्यक मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
तर यंदाच्या ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडिओ नियमितपणे दाखवावेत आणि त्यातील माहिती गरोदर व स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
८१७ अंगणवाड्या सक्षम होणार
सक्षम अंगणवाडी प्रकल्प योजनेअंतर्गत मुंबईतील ८१७ अंगणवाड्या आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज करून सक्षम केल्या जाणार आहेत. यासाठी स्नेहा सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्यात करार करण्यात आला.
जिल्ह्यांचा गौरव
गेल्या वर्षीच्या ८व्या राष्ट्रीय पोषण माहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्धा, हिंगोली आणि नागपूर जिल्हा कार्यालयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वर्धाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे व सहकारी, हिंगोलीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विजय बोराटे आणि नागपूरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कैलास घोडके यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ज्योती गायकवाड, शुभांगी लोहकर आणि कांता गायकवाड या अंगणवाडी सेविकांचाही योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.