Mamata Banerjee : लोकसभेपूर्वीच ममतादीदींनी पेटवला मोठा मुद्दा; थेट नरेंद्र मोदींना अल्टिमेटम !

West Bengal : काही वर्षांपासून केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध ताणलेले
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि केंद्रातील भाजप सरकारचे आतापर्यंत कधीही पटलेले नाही. अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यात वारंवार खडाजंगी झालेली आहे. आता इंडिया आघाडीशी संबंध ताणल्यानंतर ममता यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर दोन दिवसातच भाजपला धारेवर धरले आहे.

केंद्राकडे असलेली थकबाकी सात दिवसात राज्याला देण्याचे आवाहन दीदींनी केले आहे. सात दिवसात रक्कम जमा झाली नाहीतर केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचाही इशाराही बॅनर्जींनी दिला आहे. त्यामुळे भाजप आणि ममतादिदी पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे.

Mamata Banerjee
Ajit Pawar : सोलापुरात अजित पवार गट 'अ‍ॅक्टिव्ह'; शरद पवारांना देणार तगडी फाईट...

हजारो कोटींचा निधी थकीत

पश्चिम बंगाल सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारकडे राज्याची मोठी रक्कम थकीत असल्याचे सांगितले जाते. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्याचे केंद्र सरकारकडे नऊ हजार 330 कोटी, मनरेगाचे सहा हजार 900 कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 830 कोटी, मिड-डे मिलअंतर्गत 175, पीएम ग्राम सडकचे 770 कोटी, तर स्वच्छ भारत मिशनचे 770 कोटी रुपये थकीत आहेत. तसेच अन्य योजनाअंतर्गतही राज्याची मोठी रक्कम केंद्राकडे थकीत असल्याचेही पश्चिम बंगालच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Mamata Banerjee
Advocate Couple Death : आधी पाच तास छळ, नंतर हत्या; वकील दाम्पत्य हत्याप्रकरणी खळबळजनक माहिती समोर

राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या थकीत रक्कम तात्काळ मिळण्यासाठी ममता बॅनर्जींनी 20 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली होती. राज्यातील आणि केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत प्रलंबित निधीबाबत तोडगा काढण्याची मागणी बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर केली होती. यास आता दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी केंद्राकडून काही उत्तर आले नसल्याने दीदी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातूनच त्यांनी केंद्र सरकारला सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीत बिघाडी सुरू झालेली आहे. ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) आघाडीतील काँग्रेससह घटक पक्षांना लोकसभेच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा देत इशारा दिला होता. दरम्यान, काही वर्षांपासून केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संबंधही ताणलेले आहेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या आरोप करत ममता यांनी भाजपवर टीका केली आहे. आता त्यांनी राज्याचा प्रलंबित निधी देण्यासाठी केंद्र सरकारला अल्टिमेटम दिल्याने पुन्हा हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mamata Banerjee
Eknath Khadse : सरकारनं आजचं मरण उद्यावर ढकललं; एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com