Mayawati On Rahul Gandhi : राहुल गांधींचे एक वक्तव्य अन् मायावतींनी कार्यकर्त्यांना सांगितलं सावध राहा

Kanshi Ram Mayawati Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी कांशीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मायावतींनी त्यांच्यावर टीका केली.
BSP chief Mayawati criticizes Congress leader Rahul Gandhi during a political statement.
BSP chief Mayawati criticizes Congress leader Rahul Gandhi during a political statement.sarkarnama
Published on
Updated on

Mayawati News : विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात कांशीराम हे पंडित नेहरुंच्या काळात असते तर त्यांना नेहरुंनी मुख्यमंत्री केले असते, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य करताना त्यांनी सामाजिक न्यायावर देखील भाष्य केले.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी ट्विट करत राहुल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या की, सर्व पक्षांकडून काहीही करून बहुजन समजावादी पक्षाला कमजोर करण्याचे प्रयत्न केले जात आहे. कांशीराम यांनी बनवलेली हा पक्ष आहे. अशा पक्षांपासून विशेष करून काँग्रेसपासून बसपाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी सावध राहिले पाहिजे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, सर्वांना माहिती आहे की सर्वाधिक काळ केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिली आहे. त्यांनी संविधान निर्माता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा कधीच सन्मान केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांना यांनी 'भारतरत्न' देत सन्मानित केले नाही. तर, ते कांशीराम यांना हा सन्मान देतील का?

BSP chief Mayawati criticizes Congress leader Rahul Gandhi during a political statement.
OBC corporations : देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीआधी केलेली घोषणा हवेतच, 19 ओबीसी महामंडळे केवळ कागदावरच

कांशीराम यांच्या निधनानंतंर केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसने एक दिवसाचाही राष्ट्रीय शोक घोषित केला नाही. राज्यात तेव्हा समाजवादी पक्षाची सत्ता होती. त्यांनी देखील राजकीय शोक घोषित केला होता. इतर राजकीय पक्ष केवळ दलितांच्या नावार मत मिळवू पाहत आहेत.

BSP chief Mayawati criticizes Congress leader Rahul Gandhi during a political statement.
Non Teaching Recruitment : मोठी बातमी: 21 वर्षांची प्रतीक्षा संपली! राज्यात 30 हजार शिक्षकेतर पदांची भरती होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com