New Delhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राम मंदिरावरून सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शनिवारी लोकसभेत राम मंदिरावर निवेदन केले. या वेळी भाजपने जो शब्द दिला होता तो पाळला असून, शेकडो वर्षांच्या तपस्येला फळ मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या वेळी विरोधकांवर निशाणा साधत टीकेची झोड उठविली. ते म्हणाले, मला आज कुणाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं नाही. 22 जानेवारी हा दिवस दहा हजार वर्षांतील सर्वात महत्त्वाचा आणि ऐतहासिक दिवस आहे. हा दिवस रामभक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा दिवस असून, आध्यात्मिक क्षेत्रातील चेतना देणारा दिवस आहे. हा दिवस देशाला विश्वगुरूच्या दिशेने नेणारा दिवस आहे.
'हवन में हड्डी...
राम मंदिरावरून सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरून अमित शाह चांगलेच संतापले. त्यांनी काँग्रेसला लोकसभेतच धारेवर धरले. ते म्हणाले, राम मंदिर हा चेतनेचा विषय आहे. देशवासीयांच्या या आनंदात सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. 'हवन में हड्डी नहीं डालनी चाहिए' यातच तुमचं भलं आहे, असा सज्जड दम गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना भरला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रामराज्य हे एका धर्मासाठी नाही...
जे लोक रामाशिवाय देशाची कल्पना करतात ते देशाला ओळखत नाहीत, रामराज्य हे एका विशेष धर्मासाठी नाही तर ते देशासाठी आवश्यक असल्याचं अमित शाह म्हणाले. रामायण फक्त हिंदू धर्मात नाही तर सर्व धर्मात आहे. या राम मंदिरासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला होता. रामसेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. भाजप आणि आमच्या नेत्यांसाठी राम मंदिर प्रचाराचा, राजकारणाचा विषय कधीच नाही.
मोदींशिवाय शक्य नाही...
गृहमंत्री शाह विरोधकांना म्हणाले, तुम्ही सुप्रीम कोर्टाचा मान राखत नाहीत का ? आम्ही सुप्रीम कोर्टाची लढाई लढलो, त्यानंतर आम्ही राम मंदिर पूर्ण केलं. करोडो लोकांनी आपली श्रद्धा अयोध्येत पोहोचवली. कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही राम मंदिर बांधलं. लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, नरेंद्र मोदी यांनी यासाठी आंदोलनं केली होती आणि राम मंदिर पूर्ण करणं हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय शक्य नव्हतं.
''अनेकजण म्हणत होते देशात रक्तपात होईल, पण रक्ताचा एकही थेंब न सांडता करून दाखवलं आहे. देशातील साधू संतांनी सांगितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा उपवास केला. फक्त नारळ पाणी घेऊन मोदींनी उपवास केला,'' असे शाह म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.