Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकार 3.O चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार! कॅबिनेटमध्ये 'या' महिला IAS अधिकाऱ्याची एन्ट्री?

Woman IAS officer likely to join Modi cabinet: मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात आहे. एका महिला IAS अधिकाऱ्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
Aparajita sarangi
Aparajita sarangiSarkarnama
Published on
Updated on

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असून, आगामी काही आठवड्यांत केंद्र सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सत्तेच्या समीकरणांसह आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये एका माजी महिला IAS अधिकाऱ्याचे नाव विशेष चर्चेत आले आहे.

ओडिशातील भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार अपराजिता सारंगी यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते. प्रशासनातील दीर्घ अनुभव आणि पक्ष संघटनेतील सक्रिय भूमिका यामुळे त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. 1994 बॅचच्या IAS अधिकारी राहिलेल्या सारंगी यांनी सरकारी सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

Aparajita sarangi
Kolhapur politics : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात ठिणगी! मुश्रीफांच्या मेळाव्याच्या प्रवेशद्वारावरच सतेज पाटलांची बॅनरबाजी

प्रशासनातील सेवेला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी 2018 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय भूमिका घेतली आणि लोकसभा निवडणुकीत यश मिळवले. शिक्षण, ग्रामविकास आणि वस्त्रोद्योग यांसारख्या विभागांमध्ये सचिव म्हणून काम केल्यामुळे त्यांना प्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. सध्या त्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच संसदेतील काही महत्त्वाच्या समित्यांमध्येही त्यांची जबाबदारी आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळातील काही विद्यमान मंत्र्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली नसल्याने हा निर्णय अपेक्षित मानला जात होता.

Aparajita sarangi
Nasrapur Murder Case : नसरापूरच्या चिमुकलीला अवघ्या 55 दिवसांत न्याय! भीमराव कांबळेविरुद्धचे सगळे आरोप सिद्ध : शिक्षेच्या सुनावणीची तारीखही ठरली

याशिवाय काही राज्यांतील पक्ष संघटनांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या नेत्यांच्या जागी नवीन खासदारांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसारख्या राज्यांत पुढील वर्षी निवडणुका होणार असल्याने त्या राज्यांतील राजकीय समीकरणांनाही मंत्रिमंडळ विस्तारात विशेष महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, संभाव्य नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com