BJP President : भाजप पक्षाध्यक्ष मोदी-शाह की मोहन भागवत ठरविणार?

J P Nadda News : जे.पी नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुतदवाढ देण्यात आली होती. नड्डांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदत 30 जून रोजी संपुष्टात येत आहे.
Mohan Bhagwat | Amit Shah | Narendra Modi
Mohan Bhagwat | Amit Shah | Narendra ModiSarkarnama

Mohan Bhagwat News : भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना 'एनडीए' सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या पक्षाध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे. भाजपचा नवीन अध्यक्ष नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( आरएसएस ) मुख्यालयातून ठरवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आतापर्यंत चर्चेत असलेल्या चार ते पाच नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे सुनील बन्सल, विनोद तावडे ( Vinod Tawde ), ओम माथूर, के. लक्ष्मण या चारही मोदी-शाहांच्या विश्वासातील नेत्यांचा विचार करण्यात येत असल्याचं समजतं.

जे.पी नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुतदवाढ देण्यात आली होती. नड्डांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदत 30 जून रोजी संपुष्टात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपनं अपेक्षित कामगिरी केली नाही. त्यामुळे पक्षाचं नेतृत्व दुसऱ्या नेत्याकडं जाणार असल्याचं स्पष्ट झालं.

2019 सारखी कामगिरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं केली असती, तर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता, असं माहिती मिळत आहेत.

मात्र, आता पक्षाध्यक्षपदाच्या निवडीत नवीन समीकरणाचा विचार केला जाणार आहे. शिवाय खट्टर यांना 'एनडीए' सरकारमध्ये मंत्रिपद बहाल करण्यात आलं आहे. त्याशिवाय धमेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, शिवराजसिंह चौहान यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदाच्या स्पर्धेतून हे नेतेही बाहेर पडले आहेत.

Mohan Bhagwat | Amit Shah | Narendra Modi
Modi Government 3.0 : पुन्हा 'कुबड्या' लागू नयेत; म्हणून मोदी-शाहांकडून दक्षिणेत मंत्रिपदांची पेरणी...

विनोद तावडेंचा विचार होऊ शकतो...

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचं दिल्लीतील राजकीय वजन वाढलं आहे. मोदी -शाहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. चंदीगड, हरयाणा आणि आता बिहार राज्यांचे ते प्रभारी राहिले आहेत.

राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकीत प्रचारमोहितेचे तावडे सह-समन्वयक होते. अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यापूर्वी होणाऱ्या छाननी समितीचे ते प्रमुख आहेत. त्यांनी संघटना बांधणीत क्षमता सिद्ध केल्यानं तावडेंचा पक्षाध्यक्षासाठी विचार केला जाऊ शकतो.

बंगाल, तेलंगणा अन् ओडिशात बन्सल यांची कामगिरी...

पक्षाध्यक्षपदासाठी सुनील बन्सल यांचं नाव आघाडीवर आहे. बन्सल यांनी उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत रणनीती आखणीत अमित शाहांसोबत काम केलं आहे. संघाचे कार्यकर्ते असलेले बन्सल भाजप आणि संघातील दुवा बनू शकतात.

पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशासारख्या राज्यांचं प्रभारीपदही बन्सल यांच्याकडे होते. ओडिशात भाजपनं सत्ता खेचून आणली आहे. तर, तेलंगणात खासदारांच्या संख्येत भर पडली. बंगालमध्ये भाजपनं तृणमूल काँग्रेसला नाकीनऊ आणलं होतं.

माथुर मोदींचे विश्वासू...

मूळचे राजस्थानचे असलेले ओम माथुर हे संघाचे प्रचारक राहिले होते. माथुर यांनी गुजरातचं प्रभारीपदी सांभाळलं होतं. माझुर मोदींच्या अत्यंत विश्वासातील मानले जातात. राजस्थान विधानसभा निवडणुकीत त्यांनी वसुंधरा राजे गटाशी समन्वय साधण्याची कामगिरी माथुर यांनी पाडल्याचं बोललं जातं. त्यामुळे भाजपचा पक्षाध्यक्ष नागपुरातून ठरणार की मोदी-शाहांच्या विश्वासातील नेत्याला संधी मिळते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com