BJP Ticket Controversy: भाजपच्या माजी मंत्र्याचं तिकीट कापलं! पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, पोलिसांवर दगडफेक; महामार्ग रोखला

Narottam Mishra BJP ticket controversy: माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे भाजपने तिकीट कापल्याची चर्चा रंगताच हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महामार्ग रोखल्याने 12 तास वाहतूकोंडी झाली.
Narottam Mishra BJP ticket controversy
Narottam Mishra BJP ticket controversySarkarnama
Published on
Updated on

भोपाळ : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी गृहमंत्री नारोत्तम मिश्रा यांच्याऐवजी आशुतोष तिवारी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाविरोधात मिश्रा यांच्या समर्थकांनी तीव्र आंदोलन केले.

आंदोलनादरम्यान तीन हजारांहून अधिक समर्थकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ (NH-44) सुमारे १२ तास रोखून धरला. आंदोलन चिघळल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत दतिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले.

२०२३ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र भारती यांनी तत्कालीन गृहमंत्री नारोत्तम मिश्रा यांचा सुमारे ७,५०० मतांनी पराभव केला होता. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यात फसवणुकीच्या एका प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने राजेंद्र भारती यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे त्यांचे आमदारपद रद्द झाले आणि दतिया मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. नंतर त्यांना या प्रकरणात जामीनही मंजूर झाला.

Narottam Mishra BJP ticket controversy
Operation Tiger 3: ठाकरेंचे नगरसेवक फोडण्यासाठी शिंदेंनी नेमलेला 'एजंट' कोण? नाशिकचे नगरसेवक घेताहेत शोध

दरम्यान, भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी नारोत्तम मिश्रा यांना अपेक्षा होती. त्यांनी उमेदवारी अर्जाचाही फॉर्म घेतला होता. मात्र, पक्षाने आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिल्याने मिश्रा समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्याचेच रूपांतर आंदोलनात झाल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.

Narottam Mishra BJP ticket controversy
Teacher News: अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा! शिक्षक-शिक्षकेतर नियुक्त्यांना महिनाभरात मंजुरी

नारोत्तम मिश्रा यांना उमेदवारी नाकारल्याचे समजताच दतिया येथे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी उसळली. अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीनामे देणाऱ्यांमध्ये दतिया जिल्हाध्यक्ष रघुवीर कुशवाहा यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

  • नारोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापल्याने भाजपमध्ये नाराजी उसळली.

  • समर्थकांनी आंदोलन करत NH-44 तब्बल 12 तास रोखला.

  • अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचा दावा करण्यात आला.

  • पोलिसांशी झटापट व दगडफेकीत अनेक जण जखमी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com