Mukhtar Ansari News : 'मुख्तार अन्सारीचा मृत्यू नाही खूनच...', भाऊ अफझालने थेट धमकीच दिली

Mukhtar Ansari Death case : उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्हा कारागृहात मुख्तार अन्सारी शिक्षा भोगत होता. त्याच्या मृत्यूनंतर आता अफझल अन्सारी याने थेट धमकी वजा इशारा देत सांगितले की, मुख्तार यांचा विषप्रयोगानेच मृत्यू झाला आहे.
Mukhtar Ansar, afjal ansari
Mukhtar Ansar, afjal ansari sarkarnama
Published on
Updated on

UP Political News : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तार अंन्सारी याचा मृत्यू 28 मार्चला झाला. डाॅक्टरांनी मुख्तार यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे घोषित केले होते. मात्र, त्यांचा भाऊ अफझाल याने मुख्तार यांचा विषप्रयोग करून खून केल्याचा आरोप केला होता. आता तर अफझल याने थेट सरकारला धमकी दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्हा कारागृहात मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) शिक्षा भोगत होता. त्याच्या मृत्यूनंतर आता अफझल अन्सारी याने थेट धमकी वजा इशारा देत सांगितले की, मुख्तार यांचा विषप्रयोगानेच मृत्यू झाला आहे. म्हणूनच त्यांचा मृतदेह अशा पद्धतीने दफन करण्यात आला आहे की पाच ते दहा वर्षांनी तो कबरीतून बाहेर काढला तरी तो सुस्थितीत असेल. तेव्हा देखील त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता की नाही याची चाचणी करता येईल.

Mukhtar Ansar, afjal ansari
Arvind Kejriwal News : किसने पी, किसने है पिलाई, सब मदहोश है! केजरीवालांच्या अडचणी आणखी वाढणार

अफझाल यांनी तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्तार यांना आजारी असताना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आयसीमधून त्याची तब्येत चांगली असल्याचे सांगत त्यांची रवानगी पुन्ह तुरुंगात करण्यात आली. मात्र, अवघ्या दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. जर आयसीयूमधून सोडल्यानंतर जर्नल वाॅर्डमध्ये ठेवले जाते. मात्र, मुख्तार यांचा घातपात करण्यासाठी त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगात करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्तार यांचा नियोजित खून करण्यात आला आहे. मेडिकल कॉलेजातील डॉक्टर, जेलमधील डॉक्टर, जेल प्रशासन, सरकारकडून साध्या ड्रेसवर असलेले एलआययू आणि एसटीएफचे लोक यांनी नियोजन करुन मुख्तारचा खून केला. जेलमध्ये असताना त्यांच्यावर 50 खटले दाखल केले. मात्र आम्ही मुख्तार यांचा मृत्यूदेह अशा पद्धतीने दफन केला आहे की पुन्हा दहा वर्षांनी देखील त्यांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून तपासणी करता येईल, असे अफझाल यांनी म्हटले.

Mukhtar Ansar, afjal ansari
Kangana Ranaut : कंगनावरील 'ती' पोस्ट काँग्रेसला पडली महागात; निवडणूक आयोगाने 'या' महिला नेत्याला फटकारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com