Iran-USA War: आखाती देशात निर्यात महागली! इमर्जन्सी सरचार्ज लागू; कुठल्या वस्तूंना बसणार फटका? शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान

Iran-USA War: त्यामुळं भारतून निर्याण होणाऱ्या शेतमालावर तसंच इतर वस्तू तिकडं पाठवणं महागलं आहे. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत वस्तूंच्या किंमतीत मोठी घट होणार आहे.
Iran-USA War additional surcharge for export
Iran-USA War additional surcharge for export
Published on
Updated on

Iran-USA War: इराण विरुद्ध अमेरिका अन् इस्रायल या देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये मालाच्या निर्यातीवर अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. त्यामुळं भारतून निर्याण होणाऱ्या शेतमालावर तसंच इतर वस्तू तिकडं पाठवणं महागलं आहे. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत वस्तूंच्या किंमतीत मोठी घट होणार आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे.

Iran-USA War additional surcharge for export
Raj Thackeray: ठाकरे बंधुंमध्ये बिनसलं! राज ठाकरेंच्या नाराजीवर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, आम्ही...

इमर्जन्सी सरचार्ज

आखातातील युद्धामुळं भारतीय शेतमालाला बसतो आहे कारण गेल्या चार दिवसांपासून शेतमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळं या मालाचं आता करायचं काय? असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आता निर्यात करणाऱ्या वाहतूकदारांकडून हा माल आखाती देशांमध्ये नेण्यासाठी अतिरिक्त कर लागू केला आहे. ३ मार्चपासून हा इमर्जन्सी सरचार्ज लागू करण्यात आला आहे. त्यामुळं आता शेतमालासोबतच इतर वस्तू आखाती देशात पाठवण्यासाठी अतिरिक्त खर्च येणार आहे.

Iran-USA War additional surcharge for export
Rajya sabha Election : धैर्यशील पाटलांची खासदारकी 2 वर्षांचीच ठरली; तटकरेंची पॉवर अन पत्नीचा पराभव ठरला सेटबॅक

प्रचंड अतिरिक्त खर्च लागू

त्यानुसार, प्रत्येकी २० ड्राय, कंटेनरला अतिरिक्त २००० अमेरिकन डॉलर, तर प्रत्येकी ४० ड्राय कंटेनरला ४००० अमेरिकन डॉलर त्याचबरोबर प्रति रिफर अथवा विशेष उपकरणांसाठी ४००० रुपये प्रति अमेरिकन डॉलर इतका सरचार्ज लावण्यात आला आहे. याचा भारतीय रुपयांमध्ये विचार केल्यास एका कॅन्टरसाठी १०,००० रुपये अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. त्याचबरोबर शिपिंगचा गेटींच चार्ज लावण्यात आला आहे तो किमान ३,००० डॉलरमध्ये एकावेळी ४ लाख रुपये इतका प्रचंड आहे. हा एवढा खर्च व्यापारी भरु शकत नाहीत.

Iran-USA War additional surcharge for export
Purandar Panchayat Samiti : विजयबापू शिवतारेंचा संजय जगतापांना धोबीपछाड : राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला शिवसेनेचा धक्का

या शेतमालाला सर्वाधिक फटका

यामुळं काही मालाचे कॅन्टर हे परत मागवायला सुरुवात केली आहे, तर जे कॅन्टर अजूनही उभे आहेत त्याला एवढा खर्च असूनही ते वेळेत पोहोचलीत की नाही? याचा खात्री शिपिंगवाले देत नाहीएत. त्यामुळं त्याचा निश्चितच परिणाम हा बाजारभावावर झालेला आहे. त्यामुळं कांदा बाजाराचा विचार केल्यास केवळ नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील सगळीकडेच कांद्याच्या दरात ३ रुपयांनी तफावत निर्माण झालेली आहे. त्यामुळं जर असंच हे वातावरण कायम राहिलं तर इतर शेतमालावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसू शकेल. याचा फटका भारतीय शेतमालातील कांदा, द्राक्षे, केळी किंवा अन्य शेतमाल जे आपण भारतातून आखाती देशांत पाठवतो, या मालाच्या उत्पादकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

Iran-USA War additional surcharge for export
Navneet Rana Emotional : राज्यसभेचं तिकीट कापलं, नवनीत राणा भावूक; म्हणाल्या, 'कुठल्याही...'

कुठल्या देशात जातो माल?

भारतातून ज्या आखाती देशांमध्ये शेतमाल पाठवला जातो त्यामध्ये इराक, बहरीन, कुवेत, येमेन, कतार, ओमान, संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त, जिबूती, सुदान या देशांमध्ये वाहतुकीसाठी अतिरिक्त सरचार्ज लागू करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com