Modi To DeveGowda : नरेंद्र मोदींनी देवेगौडांची इच्छा पूर्ण केली अन्‌ कुमारस्वामींनी भाजपसोबत हातमिळवणी केली

BJP-JDS Alliance : लोकसभा निवडणुकीत ‘जेडीएस’ने कर्नाटकात भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता.
Narendra Modi-HD Deve Gowda
Narendra Modi-HD Deve GowdaSarkarnama

New Delhi : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी १९९६ मध्ये त्यांच्या कारकिर्दीत महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव, जनता दलाचे शरद यादव, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी महिला आरक्षण विधेयकाला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे हे विधेयक देवेगौडा यांना त्याकाळी मांडता आले नव्हते. त्यावेळी त्यांच्या या मागणीला कडाडून विरोध करताना बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी हे विधेयक माझ्या मृत्यूनंतरच सहमत होईल, असे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांची कोंडी झाली होती. मात्र, देवेगौडा यांची इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण करताच इकडे कुमारस्वामींनी भाजपसोबत युती केल्याची घोषणा केली. (Narendra Modi fulfilled Deve Gowda's wish and Kumaraswami joined hands with BJP)

Narendra Modi-HD Deve Gowda
Maharashtra Politics : मुंबईत पोचताच शिवसेना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी केले मोठे विधान...

त्यानंतर आता तब्बल २७ वर्षांनंतर एच.डी. देवेगौडा यांचे स्वप्न साकार झाले असून, लोकसभेत महिला विधेयक सहमत करण्यात मोदी सरकारला यश आले आहे. देवेगौडा यांनी १० एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक सहमत करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत ‘जेडीएस’ने कर्नाटकात भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. हे सर्व आधीच ठरले होते, त्यावर आता केवळ शिक्कामोर्तब झाला आहे. कर्नाटकातील २८ जागांपैकी पाच जागा ‘जेडीएस’ला देण्याचे ठरले आहे, त्यापैकी चार जागा निश्चित झाल्या आहेत. एक जागेबाबत त्यांच्यात चर्चा सुरू आहे.

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता गमावावी लागली होती. तसेच,‘जेडीएस’ पक्षाच्या हातीही काही लागले नव्हते. आगामी लोकसभा निवडणुकीत अधिक नुकसान टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून युतीचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या युतीमुळे भाजपला कमकुवत असलेल्या दक्षिण कर्नाटकमध्ये ‘जेडीएस’च्या मदतीचा फायदा होणार आहे. या भागात जेडीएसची मोठी ताकद आहे.

Narendra Modi-HD Deve Gowda
Supriya Sule to Fadnavis : देवेंद्रजी, आतापर्यंत किती बॅंकांविरोधात एफआयआर दाखल केला; सुप्रिया सुळेंचा सवाल

दरम्यान, यापूर्वी २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही दोन वेळा महिला विधेयक लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या विधेयकाला कडाडून विरोध झाल्याने त्यांना सहकारी पक्षाची सहमती मिळत नसल्याने हे बिल मांडता आले नव्हते. नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक संसदेत मांडून ते मंजूर करून घेण्यात यश मिळविले आहे.

Narendra Modi-HD Deve Gowda
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी वडेट्टीवारांचे नार्वेकरांना पत्र; ‘लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्यासाठी...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com