MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी वडेट्टीवारांचे नार्वेकरांना पत्र; ‘लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्यासाठी...’

Wadettiwar wrote Letter to Adv Narwekar : महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या बंडखोरीप्रकरणी आमदार अपात्रता सुनावणीकडे संपूर्ण राज्यातील लोकशाही आणि न्यायप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे.
Vijay Wadettiwar-Adv Rahul Narwekar
Vijay Wadettiwar-Adv Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी (ता. २५ सप्टेंबर) होणार आहे. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी ‘शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ऑनलाइन लाइव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी,’ अशी मागणी केली आहे. (Vijay Wadettiwar's letter to Adv Rahul Narwekar on Shiv Sena MLA disqualification case)

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता दिरंगाईप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. आम्ही तीन महिन्यांची मुदत दिली नव्हती. पण, अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखायला हवा होता. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी एक आठवड्यात घेण्यात यावी आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कधीपर्यंत देणार, याबाबत निश्चित कालावधी दोन आठवड्यांनी होणाऱ्या सुनावणीत देण्यात यावा, असा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तातडीने २५ सप्टेंबरला पुढची सुनावणी ठेवली आहे. ती सुनावणी लाइव्ह प्रक्षेपणाद्वारे करण्यात यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar-Adv Rahul Narwekar
Maharashtra Politics : मुंबईत पोचताच शिवसेना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी केले मोठे विधान...

पत्रात वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या बंडखोरीप्रकरणी आमदार अपात्रता सुनावणीकडे संपूर्ण राज्यातील लोकशाही आणि न्यायप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवून या प्रकरणाचा न्यायनिवाडा करावा, असे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने बंडखोर आमदारांवर काय कारवाई करणार, हे राज्यातील जनतेला कळले पाहिजे.

राज्यातील राजकारणाच्या ढासळत्या दर्जामुळे नागरिकांमध्ये राजकीय व्यवस्थेबाबत नकारात्मक भावना आहे. ती लोकशाहीच्या दृष्टीने हिताची नाही. विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने आपण या प्रकरणाचा कसा न्यायनिवाडा करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. संविधानिक संस्था, पदे आणि लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लाइव्ह कार्यक्रमाद्वारे करण्यात यावी. त्याचे ऑनलाइन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात यावे. आपण ती मागणी मान्य कराल, अशी मला आशा आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी ॲड. नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेले आहे.

Vijay Wadettiwar-Adv Rahul Narwekar
Tatkare On Supriya Sule : सुप्रिया सुळे भाग्यवान, त्यांना अजितदादांसारखा भाऊ मिळाला; सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com