Karnatak Assembly Election : कर्नाटकमध्ये सत्ता राखण्यासाठी नरेंद्र मोदींच्या तब्बल 'एवढ्या' सभा!

Karnataka Election : कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापलं
Karnatak Assembly Election
Karnatak Assembly ElectionSarkarnama

Karnataka Assembly Bjp Rally : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यातील काँग्रेस, भाजप आणि इतर स्थानिक पक्षांनी आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती दिली आहे.

सध्या कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते निवडणूक प्रचारात आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याच्या तयारीत आहेत.

या पार्श्वभूमीवरच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्लीत भाजपची एक मोठी बैठक होण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्नाटकमध्ये प्रचारासाठी कोणत्या भाजप नेत्यांची फौज उतरणार? याची चर्चाही या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Karnatak Assembly Election
Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर; मुख्यमंत्र्यांची गाडी अडवत घेतली झाडा-झडती

तसेच आतापर्यंत ४० स्टार प्रचारकांची यादी निश्चिती करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कर्नाटकमध्ये तळ ठोकण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या किमान 20 रॅली आणि काही सभा होण्याची शक्यता आहे.

प्रचारामध्ये कोणत्या भाजप नेत्यांची फौज उतरणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह असून काही दिग्गज नेत्यांचा प्रचारामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

Karnatak Assembly Election
Karnataka Assembly Election : भाजपचा कर्नाटकमध्ये उमेदवार निवडीसाठी 'अमेरिकन पॅटर्न'; काय आहे प्रक्रिया?

कर्नाटकमध्ये मतदान कधी होणार?

कर्नाटकमध्ये 10 मे रोजी 224 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल तर 24 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. राज्यात 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com