दिल्लीत दाखल होताच वानखेडेंनी केला वेगळाच दावा

क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे अडचणीत आले आहेत.
Sameer Wankhede
Sameer Wankhede
Published on
Updated on

मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे अडचणीत आले आहेत. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने केलेल्या गंभीर आरोपांनंतर एनसीबी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अखेर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली आहे. वानखेडे तातडीने दिल्लीत दाखल झाले होते. दिल्लीत पोचल्यानंतर मात्र, त्यांनी वेगळाच दावा केला आहे.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांना काल (ता.25) सायंकाळी तातडीने दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. याचबरोबर एनसीबीचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह दोन निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. वानखेडेंवरील आरोपांची चौकशी हे पथक करणार आहे. वानखेडे हे काल दिल्लीत दाखल झाले आहेत.

दिल्लीत पोचल्यानंतर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एनसीबीने चौकशीसाठी बोलावले नसल्याचा खुलासा केला होता. मला चौकशीसाठी समन्स बजावलेले नसून, वेगळ्याच कामासाठी बोलावले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्यावरील आरोप निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वानखेडे हे दिल्लीच्या एनसीबीच्या कार्यालयात पोचले असून, वानखेडेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Sameer Wankhede
आर्यन खानला जामीन मिळणार? मुकुल रोहतगी उतरले मैदानात

वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, या प्रकरणी उपमहासंचालकांनी दिलेला अहवाल एनसीबीच्या संचालकांना मिळाला आहे. त्यांनी या प्रकरणी दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी आताच सुरू झाली असून, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल लगेच टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही.

Sameer Wankhede
कोरोना लस घेतल्याने अभिनेत्याचा मृत्यू? अखेर सत्य आलं बाहेर

आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. एनसीबीवरील लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टि्वट करीत वानखेडेंबाबत गैाप्यस्फोट केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com