नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फजल (Mohammad Fazal) यांना लोकसभेतून (Lok Sabha) बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ एकने घटले असून आता पक्षाचे लोकसभेत चारच खासदार उरले आहेत. (NCP MP Mohammad Fazal expelled from Lok Sabha)
सन २००९ मधील एका राजकीय प्रकरणात खुनी हल्ल्या प्रकरणी केरळमधील एका सत्र न्यायालयाने खासदार फजल यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या २०१३ च्याआदेशानुसार फजल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मोहम्मद फजल हे लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. महाराष्ट्राबाहेर निवडून आलेले ते राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत. २०१४ च्या मोदी लाटेतसुद्धा फजल हे लक्षद्वीपमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, त्यांना २००९ मधील एका राजकीय प्रकरणात खुनी हल्लाप्रकरणी केरळमधील एका जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
सन २०१३ मधील लीली थॉमस प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचे जे जेजमेंटनुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा झाली असेल तर संबंधित लोकप्रतिनिधी तत्काळ निलंबित होतो. पूर्वीच्या नियमानुसार एखाद्या प्रकरणात लोकप्रतिनिधी दोष आढळला तर त्याला दाद मागता येत होती. मात्र, २०१३ च्या जजमेंटनंतर तातडीने निलंबनाची कारवाई होते, त्यानुसार फजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.