NCP Sharad Pawar Party : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तडकाफडकी मोठा निर्णय..दिल्लीतील पक्षाची प्रदेश कमिटी बरखास्त

NCP Sharad Pawar Party changes news : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने विविध नियुक्त्या आणि फेररचना करण्यात येत आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

New Dehli news : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गेल्या काही दिवसापासून संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्यात येत आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने विविध नियुक्त्या आणि फेररचना करण्यात येत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिल्ली प्रदेशातील संघटनात्मक रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विद्यमान प्रदेश समिती तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली आहे.

दिल्लीतील पक्षाच्या प्रादेशिक कामकाजासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. दिल्ली प्रदेशातील संघटनात्मक रचनेत फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. येत्या काळात लवकरच सुकाणू समिती, नवी प्रदेश कमिटीची घोषणा करण्यात येणार आहे.

पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्रादेशिक कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे चालवण्यासाठी प्रादेशिक नेत्यांशी चर्चा करून लवकरच सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासोबतच आगामी काळात दिल्ली प्रदेशाची नवी कमिटीही लवकरच घोषित केली जाणार आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar NCP: मोठी बातमी: शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, आव्हाडांसह कुणाला मिळाली संधी?

विद्यमान प्रदेश समिती तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली असल्याने आता येत्या काळात दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अलीकडच्या काळात संघटनात्मक पातळीवर फेरबदल सुरू आहेत. संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नव्या नियुक्त्या जाहीर केल्या; पुण्यात काँग्रेस-शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचा 'तोच' फॉर्म्युला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com