Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नव्या नियुक्त्या जाहीर केल्या; पुण्यात काँग्रेस-शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचा 'तोच' फॉर्म्युला

Sharad Pawar NCP Two Pune City Presidents : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही मोठा निर्णय घेतला असून संघटनात्मक फेरबदल केले आहेत.
 NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक फेरबदलांचे सत्र सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आता एकाच नेत्याकडे न ठेवता पक्षाने पुणे पश्चिम आणि पुणे पूर्व अशा दोन विभागांमध्ये संघटनात्मक विभागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुण्यात दोन शहराध्यक्षांचा पॅटर्न स्वीकारला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तत्कालीन पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने तातडीने शहराध्यक्षपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे सोपवली होती. मात्र, आता पक्षाने संघटनात्मक पातळीवर आणखी एक महत्त्वाचा बदल करत पुणे शहराची जबाबदारी दोन नेत्यांमध्ये विभागली आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील नियुक्तीपत्रे जाहीर केली. त्यानुसार पुणे पश्चिम शहराध्यक्ष म्हणून विशाल तांबे, तर पुणे पूर्व शहराध्यक्ष म्हणून श्रीकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 NCP Sharad Pawar
Sharad Pawar Politics : 'ऑपरेशन टायगर'नंतर 'ऑपरेशन तुतारी'; शरद पवारांचा थेट इशारा, म्हणाले, 'आमचा एकही...'

विशाल तांबे यांच्याकडे पुणे पश्चिम भागातील संघटन मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, हडपसर, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. तर श्रीकांत पाटील यांच्याकडे पुणे पूर्व शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात शिवाजीनगर, कोथरूड, वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

पुणे शहरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मोट बांधणे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची स्वतंत्र यंत्रणा उभी करणे, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

विशेष म्हणजे, पुण्यात काँग्रेस आणि शिवसेनेनेही संघटनात्मक सोयीसाठी शहराध्यक्षपदाची विभागणी करण्याचा पॅटर्न स्वीकारला आहे. त्याच धर्तीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाच्या विभागनिहाय संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

 NCP Sharad Pawar
Sharad Pawar NCP : शरद पवार भाकरी फिरवणार! पक्षाची बैठक सुरू, 'ती' यादी फायनल होणार

पुणे महापालिका निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक नेत्यांचे पक्षांतर झाले असून, विविध पक्षांकडून संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे शहराची जबाबदारी दोन भागांत विभागून नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. आता विशाल तांबे आणि श्रीकांत पाटील हे पुण्यात पक्षाला किती बळ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com