NEET exam cancelled : धक्कादायक! NEET 2026 ची परीक्षा रद्द : पेपरफुटीमुळे मोदी सरकारवर मोठी नामुष्की

NEET 2026 exam cancelled news : पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर NEET 2026 परीक्षा रद्द करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
NEET exam cancelled
NEET exam cancelledSarkarnama
Published on
Updated on

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे वादाच्या भोऱ्यात सापडली होती.

विविध राज्यांतून प्रश्नपत्रिका आधीच बाहेर पडल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली वैद्यकीय प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

NEET exam cancelled
Jalna attack news : 'तेरे को देख लेता बहार आ', असे म्हणत भाजप नगरसेवकाकडून सभापतीला धमकी

या प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिली होती, मात्र पेपरफुटीच्या बातम्यांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. काही ठिकाणी 42तास आधीच परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर फिरत असल्याचे दावे करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे.

या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे तपास सोपवण्यात आली आहे. पेपरफुटीमागे कोणते रॅकेट कार्यरत होते, कोणत्या पातळीवर निष्काळजीपणा झाला आणि यात कोणाचा सहभाग होता याचा तपास आता केला जाणार आहे. शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्याने सरकारलाही टीकेला सामोरे जावे लागत आहे.

NEET exam cancelled
Eknath Shinde News: महापालिका हुकली, आता ZP जिंकणारच; शिंदेंची राज्यभर जोरदार मोर्चेबांधणी

नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. पुन्हा परीक्षा कधी होणार, नवीन वेळापत्रक काय असेल आणि प्रवेश प्रक्रिया किती उशिरा पूर्ण होईल याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असून पालकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com