Jalna attack news : 'तेरे को देख लेता बहार आ', असे म्हणत भाजप नगरसेवकाकडून सभापतीला धमकी

Standing Committee Chairman Makarand Pangarkar allegedly attacked with dagger and iron rods corporator Mahaveer Dhakka and supporters Jalna, triggering political tension municipal corporation : जालना महापालिकेत बहुमतासह सत्ता हाती असलेल्या भाजप नगरसेवकांमध्ये वार्डातील विकास कामावरून गुदागुद्दीचा प्रसंग कालच्या स्थायी समिती बैठकीत घडला.
Jalna Municipal Corporation
Jalna Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Jalna Municipal Corporation : जालना महापालिकेत बहुमतासह सत्ता हाती असलेल्या भाजप नगरसेवकांमध्ये वार्डातील विकास कामावरून गुदागुद्दीचा प्रसंग कालच्या स्थायी समिती बैठकीत घडला.

स्थायी समितीचे सभापती मकरंद पांगारकर यांनी आपल्या प्रभागातील विकास कामासंदर्भात ठराव न घेतल्यामुळे संतापलेल्या कैलास गोरंट्याल समर्थक नगरसेवक महावीर ढाका यांनी थेट सभापतीला धमकी देत, 'तू बहार आ तेरे को देखता', असे म्हणत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

महावीर ढाका यांनी धमकी दिल्याप्रमाणे बैठकीनंतर महापौर दालनातच सभापती मकरंद पांगारकर यांच्यावर त्यांच्या समर्थकांनी खंजीर आणि रॉडने हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून पांगारकर बचावले मात्र एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर महापालिकेत (Municipal) तणावाचे वातावरण होते. महावीर ढाका आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर यांचे पुत्र प्रतीक पांगारकर यांनी कदीम जालना (Jalna) पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. महावीर डाका यांच्या वार्डातील कामांचे काही ठराव स्थायी समिती सभापती मकरंद पांगारकर यांनी बैठकीत न घेतल्यामुळे या दोघांमध्ये सभागृहातच शाब्दिक वाद झाला होता. दरम्यान तू बहार आ तेरेको देखता असे म्हणत महावीर टाका सभागृहातून निघून गेले होते.

Jalna Municipal Corporation
Government officer bribery allegation : देवाभाऊंचं सरकार अन् ‘ना खाऊंगा’चा फुसका फुगा? ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांच्या ‘लक्ष्मी दर्शना’वर भाजप आमदारांसमोर स्फोट!

दुपारी बैठकीनंतर वाद पुन्हा उफाळून आला. वाद सुरू असतानाच रणवीर ढाका याने प्रतीक पांगारकर यांच्यावर धावून जात खंजीर उपसला. मात्र तो बाजूला सरकल्याने तो वार, त्याचा मित्र धरमसिंग ठाकूर यांच्या डोळ्याजवळ लागला, असे प्रतीक याने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. महापालिकेतील या राड्याची माहिती मिळताच माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Jalna Municipal Corporation
Ashok Kharat ED case : ‘गुन्ह्यातील पैसा कुणाच्या खिशात?’ अशोक खरातला मुंबईत विशेष न्यायालयात बोलावलं

पांगारकर आणि ढाका या दोघांनाही तासभर सोबत घेत त्यांची समजूत काढत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र या त्यांना यश आले नाही. यावेळीही दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रतीक पांगारकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत थेट तक्रार दाखल केली यावरून महावीर ढाका व त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

बहुमतासह सत्ता महापौर व महापौर स्थायी समिती सभापती पद हाती असूनही भाजपच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या या राड्यामुळे जालन्यातील राजकारण चांगले तापले आहे. भविष्यातही कैलास करून त्याला समर्थक नगरसेवक आणि मूळ भाजपच्या नगरसेवकांमध्ये संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर भाजपचे नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com