Kumbh Mela Scam : धक्कादायक! सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निविदांमध्ये दुसरा घोळ, AI चा वापर करुन शासनाची कोट्यावधींची फसवणूक

Nashik Kumbh Mela Tender Fraud : फसवणुकीचा शिरकाव थेट कुंभमेळा आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत येऊन पोहचला आहे. 4 कोटी रुपयांचा नवा घोटाळा यातून पुढे आला आहे. यापूर्वी बनावट सही करुन 70 कोटींचे कंत्राट मिळवलं होतं.
Nashik Kumbh Mela Scam
Nashik Kumbh Mela ScamSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela News : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर विविध क्षेत्रात कौतुकाचा विषय आहे. मात्र सिंहस्थ कुंभमेळा कार्यालयात या माध्यमातून घोटाळे उघड होऊ लागले आहे. चार कोटी रुपयांचा नवा घोटाळा यातून पुढे आला आहे.

ठाणे येथील सायबर भामट्याने हा धक्कादायक प्रकार केला आहे. यापूर्वी 70 कोटी रुपयांच्या बनावट निविदा मंजूर झाल्याचे प्रकरण पुढे आले होते. आता त्यात नवा घोटाळा समाविष्ट झाला आहे.

या संदर्भात कुंभमेळा कक्षामार्फत पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक संशोधन अधिकारी विशाल पाटील यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ठाणे येथील सायबर गुन्हेगार अभिषेक संजय झरे याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक झरे याच्या विरोधात यापूर्वी कुंभमेळा बनावट निविदा मंजूर केल्याचा आदेश काढण्याचा गुन्हा दाखल आहे. इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स या नावाने सत्तर कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केल्याचा बनावट आदेश तयार केला होता. हा आता दुसरा प्रकार पुढे आला आहे.

Nashik Kumbh Mela Scam
Nashik Kumbh Mela Scam : स्पेलिंगमधील एक चूक अन् कुंभमेळ्यातील मोठा घोळ उघड, आयुक्त गेडामांच्या बनावट सहीने 35 कोटींची वर्कऑर्डर

चार कोटी रुपयांचा नवा बनावट आदेश उघड झाल्यावर सिंहस्थ कुंभमेळा कक्षात खळबळ उडाली आहे. पूर्वी आयुक्त प्रवीण गेडाम यांची बनावट सही असल्याचा संशय आल्याने ७० कोटींचा घोटाळा उघड झाला होता.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराच्या माध्यमातून शैक्षणिक आणि संशोधनाच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्याचा गवगवा सगळीकडे सुरू आहे. कुंभमेळा कक्षात मात्र त्याचा वापर बनावट आदेशांमध्ये होऊ लागल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. (Nashik News)

Nashik Kumbh Mela Scam
Simhastha Kumbh Mela : अजब सरकारी कारभार; रात्री व्हाॅट्सअपवर नोटीस, पहाटे घरात घुसून लाठीमार! कुंभमेळ्याच्या रस्त्यासाठी कारवाई

या निमित्ताने विभागीय महसूल आयुक्त आणि कुंभमेळा विभागाचे प्रमुख प्रवीण गेडाम यांनी विविध कामांच्या आदेशांची फेर तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात थेट मंत्रालयातून काढण्यात आलेल्या आदेशांचीही तपासणी केली जाणार आहे. 'एआय'च्या च्या माध्यमातून शासकीय आदेशातील घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com