मोठी बातमी! केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राइक! 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ; सीजेपीच्या दणक्याने केंद्रीय शिक्षण मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये

NEET paper leak latest NTA action News : केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
NEET Paper Leak Case
NEET Paper Leak Casesarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : देशभरातील वातावरण नीट पेपरफुटीनंतर तापले आहे. गेल्या काही दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यातच आता केंद्रीय शिक्षण मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली असून सीजेपीच्या आंदोलनाचे यश मानले जात आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 47 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईही केली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या NTA मध्ये करण्यात येत असलेल्या व्यापक फेरबदलांचाच हा एक भाग आहे.

NEET Paper Leak Case
NEET paper leak protest: युवकांच्या ताकदीसमोर केंद्र सरकार बॅकफूटवर! सीजेपीच्या लढ्याला मोठे यश; केंद्रीय शिक्षण मंत्रालय करणार सर्वात मोठी घोषणा?

नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री ही मोठी घोषणा करण्यात आली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे.

सीजेपीच्या वतीने संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान यामुळे आता राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाकडून NTA मधील सुधारणांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षेमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षा यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असणार आहे, असे सांगितले जात आहे. यासंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 47 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईही केली जाणार आहे. या घोषणेने सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश आले असल्याचे मानले जात आहे.

NEET Paper Leak Case
Maharashtra Live Politics Update : काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी

दरम्यान, शुक्रवारी दुपारी सीजेपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी करण्यात आलेल्या तीन मागण्यापैकी दोन मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, तिसऱ्या मागणीसाठी उद्या चर्चा होणार आहे. त्यापूर्वीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश आल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com