Abhijit Dipke : अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या संतापाचा कडेलोट; मोदींवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले, "अशा माणसाला..."

Sonam Wangchuk NEET paper leak protest : "नरेंद्र मोदी यांना परमेश्वराने सुबुद्धी द्यावी की, या मुलांचे ऐकावे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. आता माझी सर्व भीती मरून गेली आहे, मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही. लोकशाही धोक्यात आली आहे आणि ही गुलामगिरीकडे जाण्याची सुरुवात आहे."
Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Published on
Updated on

Sonam Wangchuk Protest : दिल्लीच्या जंतरमंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण पद्धतीत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी गेल्या 20 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक यांची उपोषणा दरम्यान, प्रकृती बिघडली आणि दिल्ली पोलीसांनी त्यांना उपोषणस्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केले. यावेळी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या कारवाईनंतर अभिजीत दिपके यांच्या आई-वडीलांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मात्र, ही टीका करताना अभिजीत दिपके यांच्या वडीलांची जीभ घसरल्याचे दिसून आले.

"लोकशाहीमध्ये ही भारतीय लोकांची चूक आहे, की त्यांनी अशा व्यक्तीला निवडून दिलंय की ज्याला संसाराचा कुठलाही व्याप नाही, मूल नाही, कुटुंबात कोणत्या गोष्टी लागतात, याचं या व्यक्तीला काहीही देणंघेणं नाही, अशा माणसाला जनतेनं पंतप्रधानपदी बसवलं आहे. त्याचे परिणाम आता सगळा देश भोगत आहे, अशी भाषा अभिजीत दिपके याचे वडील भगवानराव दिपके टीका करताना वापरली.

Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Uddhav Thackeray : भाजप नेत्याची ऑडियो क्लिप ऐकवत उद्धव ठाकरे बरसले : CM फडणवीसांच्या शहरात काढले PM मोदींच्या हिंदुत्वाचे वाभाडे

नरेंद्र मोदी यांना परमेश्वराने सुबुद्धी द्यावी की, या मुलांचे ऐकावे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. आता माझी सर्व भीती मरून गेली आहे, मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही. लोकशाही धोक्यात आली आहे आणि ही गुलामगिरीकडे जाण्याची सुरुवात आहे. सरकारने दडपशाही न करता विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्या," असे आवाहन त्यांनी केले.

मुलासोबत उपोषणाला बसणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केल्यानंतर भगवान दिपके यांनी आपणही मुलासोबत दिल्लीत उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. माझा मुलगा परदेशात मस्त सेटल झाला होता. त्याला कर्ज काढून शिकवले होते. पण, नीट पेपर लीक प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या पाहून तो भावनेच्या भरात भारतात आला. मी त्याला खूप विनंती केली होती की, इकडे येऊ नको, इथले सरकार आणि वातावरण चांगले नाही. पण, त्याने ऐकले नाही.

Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Tukaram Mundhe : 'मुंढे पॅटर्न'चा दणका! 'आता हायगय नाही, थेट 10 लाखांचा दंड' तुकाराम मुंढेंचा पुणे अधिकाऱ्यांना 'विशेष' सूचना

आता तो उपोषणाला बसला आहे, त्याची आई-वडील म्हणून आम्हाला काळजी वाटणारच ना? असे भगवानराव दिपके म्हणाले. तर अभिजीतच्या आई अनिता दिपके यांनी, 'सरकार निर्दयी झाले आहे. लहान मुलाने बिस्किटचा पुडा मागितला तरी आई-वडील देतात, पण हे सरकार मुलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे, असा संताप व्यक्त केला. सकाळी वांगचुक सरांना जसे पडदा टाकून गपचूप उचलून नेले, तसेच जर अभिजीतबाबत झाले तर आम्ही काय करणार?

सरकारला कशाचा अहंकार आहे? त्यांनी दुसरा मंत्री दिला असता, तरी मुलांना वाटले असते की आपले ऐकले. माझा मुलगा महिनाभरापासून परेशान आहे, न खाता-पिता तिथे आहे. ज्यांना मुले-बाळे नाहीत, त्यांना लेकरांची किंमत नसते. आम्ही रविवारपासून त्याच्यासोबत उपोषणाला बसणार आहोत, असेही अनिता दिपके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com