

Pune News : अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता बेकायदेशीर आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आता कोणतीही हायगय केली जाणार नाही, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना थेट १० लाख रुपयांचा दंड ठोकणार," असा कडक इशारा त्यांनी पुण्यातून दिला आहे.
पुण्यामध्ये बोलताना तुकाराम मुंडे म्हणाले, नागरिकांना अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार अगदी सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी नव्याने एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यावर नागरिक अन्न आणि औषध प्रशासनाची निगडित तक्रार तिथे जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता. ती तक्रार थेटपणे त्या भागातील जॉईन कमिशनरला जाणार असून पुढील 24 तासात त्या तक्रारीसाठी एक अधिकारी नेमला जाणार आहे. अधिकारी त्या तक्रारीबाबत प्रत्यक्षात शहानिशा करेल आणि तक्रारीवर योग्य ते उत्तर दिलं जाईल.
जर वेळेमध्ये हे उत्तर देण्यात आलं नाही. तर ती तक्रार थेट पणे वरिष्ठांकडे जाईल आणि संबंधित अधिकाऱ्याला नोटीस जरी केलं जाणार असल्याचं तुकाराम मुंडे यांनी सांगितलं. त्यामुळे जास्तीत जास्त पारदर्शकता या सिस्टीममध्ये राहील असंही ते म्हणाले.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या अंतर्गत येणारे अनेक आस्थापणे ही विना परवाना सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. याबाबत बोलताना तुकाराम मुंडे म्हणाले, नियमाप्रमाणे जर कोणताही आस्थापनाकडे परवाना नसेल तर दहा लाखाचा दंड करता येतो. आतापर्यंत जर लायसन नसेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात दंड केला जात नव्हता कमी दंडामध्ये भागून नेलं जात होतं. मात्र इथून पुढे ते कमी मध्ये भागून घेतलं जाणार नाही. मी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. छोटा व्यवसायिक असेल तरीही दंडाची रक्कम दहा लाख प्रस्तावित असेल तर इतकाच दंड लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या माध्यमातून कोणीही विनापरवाना व्यवसाय करू नये हा मेसेज पोचवण्याची भावना एफडीएची आहे. लोकांनी पुढे येऊन लायसन घ्यावे याबाबतची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन आणि सोपी आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी परवाना घेऊन काम करावं जेणेकरून त्यांचाही व्यवसाय चांगला चालेल आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील असं तुकाराम मुंडे म्हणाले.
सध्या पाहायला गेलं तर सर्वात जास्त तक्रारी या पुणे जिल्ह्यातून आल्या आहेत. आणि त्या अन हायजिनिक फूड बाबत सर्वाधिक तक्रारी आहेत . याचा अर्थ पुण्यामध्ये सर्वाधिक भेसळ आणि अन हायजिनिक फूड आहे असं म्हणता येणार नाही. तर सर्वाधिक अवेअरनेस ही पुण्यामध्ये आहे असं देखील म्हणता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.