NEET Exam Controversy : परीक्षेसाठी आत घ्या! लेकीसाठी बापानं गेटवर डोकं आदळलं, आई हातापाया पडली, मुली रडल्या...

NEET Retest 2026, NTA News : अनेक पालकांनी आम्ही महिन्याहून अधिक काळ तणावाखाली परीक्षेसाठी वाट पाहिली. मग एनटीएकडून काही मिनिटेही विद्यार्थ्यांना सवलत दिली जाऊ शकत नाही का, असा सवाल पालकांनी केला.
NEET Retest 2026
NEET Retest 2026Sarkarnama
Published on
Updated on

NEET UG 2026 Exam Centre Chaos : देशभरात जवळपास दीड महिन्यांनी NEET (UG) फेरपरीक्षा रविवारी पार पडली. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होत असल्याने केंद्र सरकार आणि एनटीएकडून मोठी दक्षता घेण्यात आली होती. विद्यार्थीही प्रचंड तणावाखाली होती. आतापर्यंत सुमारे १७ विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केली आहे. त्यातच रविवारी देशभरात ठिकठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेत न पोहोचल्याने परीक्षा देता आली नाही.

परीक्षेसाठी केंद्रात पोहोचण्याची वेळ दुपारी दीड ही होती. त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनाही रडू कोसळल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

मध्य प्रदेशातील एक व्हिडिओ तर हृदय पिळवटून टाकणारा आहे. एक विद्यार्थीनी वडिलांसह परीक्षा केंद्रावर पोहोचली. मात्र, त्यांना दोन मिनिटे उशीर झाल्याने केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही. मुसळधार पावसामुळे वेळेत पोहोचता आले नाही, त्यामुळे प्रवेश द्यावा, अशी विनवणी त्यांनी केली. मात्र, त्यानंतर प्रवेश नाकारण्यात आल्याने विद्यार्थिनीच्या वडिलांनी थेट गेटवरच डोके आदळले. लेकीनंच त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.

NEET Retest 2026
Rahul Gandhi News : भाऊबंदकी सुरू; राहुल गांधींना मिळाला नवा 'भाऊ', पण दगाफटका होण्याची धास्ती...

अन्य ठिकाणच्या आणखी एका व्हिडिओमध्ये एक आई आपल्या लेकीला परीक्षा केंद्रात प्रवेश द्यावा, यासाठी सुरक्षारक्षकांच्या हातापाया पडत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ तेलंगणातील आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर तीन विद्यार्थ्यांनी रडत असल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. आणखी काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

अनेक पालकांनी आम्ही महिन्याहून अधिक काळ तणावाखाली परीक्षेसाठी वाट पाहिली. मग एनटीएकडून काही मिनिटेही विद्यार्थ्यांना सवलत दिली जाऊ शकत नाही का, असा सवाल पालकांनी केला. सोशल मीडियातही त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. दरम्यान, एनटीएकडून प्रवेश देण्याची वेळ दीडपर्यंतच असेल, असे स्पष्ट केले होते. केंद्रात प्रवेश दिल्यानंतर पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.

NEET Retest 2026
Operation Tiger update : 'ऑपरेशन' करूनच खासदार फोडले! एकनाथ शिंदेंनी ओमराजे, आष्टीकरांना उघडे पाडले...

वाहतूक कोंडी, पाऊस, प्रवेशपत्रातील तांत्रिक चुका आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांना विलंब झाला. विद्यार्थ्यांची चूक नसताना त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. काही पालकांकडून न्यायालयात जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. परीक्षा ने देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी, अशीही मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com