NEET UG Re-Exam 2026 Scam: NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह! 9 डमी विद्यार्थ्यांसह 30 जणांना अटक

NEET re-exam controversy: बिहारमधील लखीसराय येथे NEET UG पुनर्परीक्षेदरम्यान मोठा गैरप्रकार उघड झाला. इतर विद्यार्थ्यांच्या नावाने परीक्षा देणाऱ्या 9 तोतयांसह 30 जणांना पोलिसांनी अटक केली.
NEET UG 2026
NEET UG 2026Sarkarnama
Published on
Updated on

बिहारमध्ये नीट (NEET UG 2026) परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आला आहे. लखीसराय जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. विविध परीक्षा केंद्रांवर संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत मोठे रॅकेट उघड केले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 30 जणांना अटक करण्यात आली आहे. यात नऊ जण इतर विद्यार्थ्यांच्या ऐवजी परीक्षा देत असल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखीसराय जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. केआरके हायस्कूल परीक्षा केंद्रातून एकाला पकडण्यात आले. त्याचवेळी केंद्रीय विद्यालय केंद्रातून तब्बल सात संशयितांना अटक करण्यात आली, हसनपूर स्कूल परीक्षा केंद्रातून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून बिहारमध्ये आले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

परीक्षा सुरू असताना काही उमेदवारांच्या ओळखपत्रांमध्ये विसंगती आढळल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी, प्रवेशपत्रांची तपासणी आणि चेहरा ओळख प्रक्रियेदरम्यान अनेक उमेदवारांची माहिती जुळत नसल्याचे उघड झाले. यानंतर परीक्षा केंद्रांवर पोलिसांना बोलावण्यात आले आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

NEET UG 2026
पेन्शन सेवा आता मोबाईलवर! Maha-UPLABDHI’ म्हणजे काय?

या नऊ जणांतोतयांव्यतिरिक्त, परीक्षा गैरप्रकाराशी संबंधित आणखी 21 जणांना अटक करण्यात आली आहे. या व्यक्तींची भूमिका काय होती, त्यांनी उमेदवारांना मदत केली का, आर्थिक व्यवहार झाले का, याचा तपास सुरू आहे. काही आरोपी परीक्षा केंद्राबाहेर संशयास्पदरीत्या फिरताना आढळले होते, तर काहींकडे बनावट कागदपत्रे सापडल्याची माहिती समोर येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस करीत आहेत. चौकशीदरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पोलिस पथके संभाव्य ठिकाणी छापेमारी करत आहेत. या रॅकेटचे धागेदोरे इतर जिल्हे किंवा राज्यांशी जोडलेले आहेत का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेमुळे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने परीक्षा प्रक्रियेत अधिक कडक सुरक्षा उपाय लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com