

What happened in Delhi IRS officer daughter case: राजधानी दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे, इथल्या अमर कॉलनी भागात बुधवारी सकाळी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीचा निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, या तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आला आहे. घटनास्थळावरील संभाव्य पुराव्यांच्या अधारे लैंगिक अत्याचारानंतर मोबाईल चार्जरच्या वायरनं या तरुणीचा गळा आवळून तिचा जीव घेण्यात आल्याची शंका पोलिसांना आहे. या हत्या प्रकरणी संशयाची सुई या घरातील पूर्वीच्या नोकराभोवती फिरत आहे. या नोकराला दीड महिन्यापूर्वीच कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळं बदल्याच्या भावनेनं त्यानंच हे कृत्य केलेलं असू शकतं असा पोलिसंना संशय आहे.
बुधवारी सकाळी पोलिसांना घटनेची खबर मिळाली. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तपास सुरु झाला. फॉरेन्सिक टीमनं देखील घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आहेत तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या माहितीनुसार, मृत मुलीनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं, यानंतर ती युपीएससीची तयारी करत होती. घटना घडली तेव्हा तरुणीचे आई-वडील जीमला गेले होते.
दरम्यान, पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला असून संशयितांच्या तपासासाठी अनेक पथकं नेमण्यात आली आहेत. अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, लवकरच आरोपीला अटक करुन संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला जाईल. ज्या नोकरावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे, तो राजस्थानचा रहिवासी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.