Laura McClure : महिला खासदाराने संसदेत उभे राहून दाखवले स्वत:चेच नग्न फोटो, 'त्या' कृत्याने खळबळ; AI च्या वापरावर गंभीर प्रश्न!

Laura McClure Exposes AI-Generated Nudes : लाॅरा यांनी आपला डीपफेक फोटो तयार करून महिलांच्या बाबत तयार होणाऱ्या डीपफेकच्या वापराबाबत नवी चर्चा सुरू केली आहे.
Laura McClure
Laura McCluresarkarnama
Published on
Updated on

Laura McClure News : एका महिला खासदाराने संसदेत उभे राहून आपलेच नग्न फोटो भर सभागृहात दाखवल्याची खळबळजन घटना समोर आली. महिला खासदाराने दाखवलेल्या फोटोमागे मात्र वेगळेच कारण असल्याचे समोर आले. ही घटना न्यूझीलंडच्या संसदेत घडली आहे. आपलेच नग्न फोटो दाखवणाऱ्या महिला खासदाराचे नाव लाॅरा मॅक्लर असे आहे.

लाॅरा मॅक्लर यांनी संसदेत फोटो दाखवताना म्हटले की, 'हा डीपफेक फोटो AI च्या मदतीने अवघ्या पाच मिनिटांत मी बनवला आहे. या फोटोमध्ये मी नाही. हा खोटा आहे. तरीसुद्धा मला भीती वाटते आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महिलांच्याबाबत असे होत आहे.'

तंत्रज्ञानाचा चुकीचा वापराबाबत लाॅरा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. त्या म्हणाल्या आहे की, तंत्रज्ञान चुकीचे नाही मात्र त्याचा दुरुपयोग करणे चुकीचे आहे. त्यामुळे लोकांचे नुकसान होते याविरोधात कायद्याद्वारे ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

लाॅरा यांनी आपला डीपफेक फोटो तयार करून महिलांच्या बाबत तयार होणाऱ्या डीपफेकच्या वापराबाबत नवी चर्चा सुरू केली आहे. डीपफेकबाबत कारवाई करण्यासाठी न्युझीलंडमध्ये कोणताही कायदा नाही. लॉरा हा डीपफेक डिजिटल हार्म एंड एक्सप्लॉइटेशन या कायद्याचे समर्थन करत आहे. हा कायदा रिवेंज पाॅर्न आणि खासगी व्हिडिओ रिकॉर्डिंची संबंधित असलेल्या कायद्या सुधारणा करेल.

Laura McClure
Dino Morea ED case : आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय डिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या; 'ईडी'ने उचललं मोठं पाऊल

महिलांच्या फोटोचा चुकीचा वापर

लॉरा मॅक्लर यांनी सांगितले की, गुगल सर्चद्वारे एका वेबसाईटचा वापर करून हा फोटो अवघ्या पाच मनिटात बनवला आहे. हा फोटो बनवत असताना तुम्ही 18 वर्षपूर्ण आहात का? फोटोतील व्यक्तिची तुम्ही सहमती घेतली आहे का? अशा प्रश्नांच्या बाॅक्सवर फक्त एक क्लिक केला असताा हा न्यूड फोटो तयार करण्यात आला. 90 महिलांच्या फोटोचा गैरवापर होतो आहे. त्यामुळे न्युझीलंडमध्ये डीपफेकबाबत कोणताही कायदा नाही त्यामुळे नवा कायदा आणावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

Laura McClure
Rahul Gandhi poll fixing claim : 'महाराष्ट्रात लोकशाहीचा शिरच्छेद करण्यात आला'; रमेश चेन्नीथला म्हणाले, 'राहुल गांधींच्या सत्य दस्ताऐवजामुळे...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com