Union Budget 2026 : अर्थसंकल्पात सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरदूत, निर्मला सीतारमण यांची घोषणा

Nirmala Sitharaman budget speech : केंद्र सरकारने देशातील गरिबी निर्मुलनासाठी महत्त्वाचे काम केले आहे. शिवाय उच्चस्तरीय समित्या स्थापन करून जुने कायदे काढून टाकले आहेत. मागील १२ वर्षांपासून देशाचा नियोजनबद्ध विकास सुरू असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
Union Finance Minister Nirmala Sitharaman presenting the Union Budget in Parliament, outlining reforms, economic growth strategy and semiconductor investment.
Union Finance Minister Nirmala Sitharaman presenting the Union Budget in Parliament, outlining reforms, economic growth strategy and semiconductor investment.Sarkarnama
Published on
Updated on

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेच अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली आहे. संत रविदासांचे नाव घेत निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. भाषणाच्या सुरूवातीलाच केंद्र सरकारची सुधारणांची एक्सप्रेस वेगाने विकास करत असल्याचा दावा केला.

तसंच केंद्र सरकारने देशातील गरिबी निर्मुलनासाठी महत्त्वाचे काम केले आहे. शिवाय उच्चस्तरीय समित्या स्थापन करून जुने कायदे काढून टाकले आहेत. मागील १२ वर्षांपासून देशाचा नियोजनबद्ध विकास सुरू असल्याचंही त्या आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच निर्मला सितारमण म्हणाल्या.

शिवाय देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यात आली आहे. ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यात आली असून सरकारने सामान्य जनतेला प्राधान्य दिले आहे. भारताच्या विकासाचा प्रवास सातत्यपूर्ण आर्थिक वाढ आणि नियंत्रित महागाईने वैशिष्ट्यपूर्ण ठरल्याचंही त्यांनी सांगितलं.

Union Finance Minister Nirmala Sitharaman presenting the Union Budget in Parliament, outlining reforms, economic growth strategy and semiconductor investment.
ZP Elections 2026 : देवेंद्र फडणवीस ZP निवडणुकीसाठी प्रचार करणार नाहीत..., अजितदादांच्या निधनामुळे घेतला मोठा निर्णय!

यावेळी त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात सेमीकंडक्टर क्षेत्रावर जास्त भर दिल्याचं सांगत तब्बल ४० हजार कोटींची तरदूत सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी केल्याचंही अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितलं. तसंच तीन मोठ्या केमिकल पार्कची घोषणा करत.

Union Finance Minister Nirmala Sitharaman presenting the Union Budget in Parliament, outlining reforms, economic growth strategy and semiconductor investment.
Leader of Opposition : महापौर पदाची चर्चा सोडा 'या' महापालिकेला तब्बल 10 वर्षानंतर मिळणार विरोधी पक्षनेता

एका मेगा टेक्सटाईलची उभारणी करणार असल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. तर देशातील वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकलेला चालना देणार शिवाय हातमागासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज्य अभियान राबवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com