Leader of Opposition : महापौर पदाची चर्चा सोडा 'या' महापालिकेला तब्बल 10 वर्षानंतर मिळणार विरोधी पक्षनेता

Vasai-Virar Municipal Corporation BJP : वसई विरार महापालिकेला तब्बल दहा वर्षानंतर विरोधी पक्षनेता मिळणार आहे.
Vasai-Virar Municipal Corporation
Vasai-Virar Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on

Vasai-Virar News : महापौर पदाची चर्चा सुरू असताना वसई-विरार महापालिकेला तब्बल 10 वर्षानंतर विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे. कारण वसई विरार- महापालिकेत मागील वेळी विरोधकांकडे येवढे संख्यबळच नव्हते की ते विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगतील. तेव्हा फक्त सहा जागा विरोधकांना मिळाल्या होता. बहुजन विकास आघाडी तेव्हा सत्तेत होती.

वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर विरोधी पक्षाला 25 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी पालिकेत विनायक निकम हे विरोधीपक्ष नेता म्हणून स्थानापन्न झाले होते. परंतु दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षाला ६ जागा मिळाल्याने त्यावेळी विरोधीपक्ष नेता निवडण्यात आला नव्हता. त्यामुळे आता थेट २०१५ नंतर म्हणजेच १० वर्षानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेता असणार आहे. भाजपला विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे.

वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिली निवडणूक २०१० मध्ये झाली. त्यावेळी बहुजन विकास आघाडीने सत्ता स्थापन करीत पहिला महापौर बहुजन विकास आघाडीचा महापौर झाला. जनआंदोलन समिती या बॅनरखाली विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत महापालिकेची निवडणूक लढविली होती. जन आंदोलन समितीला सत्ता स्थापन करता आली नाही, परंतु विरोधी बाकावर बसण्याची संधी त्यांना मिळाली.

Vasai-Virar Municipal Corporation
ZP Elections 2026 : देवेंद्र फडणवीस ZP निवडणुकीसाठी प्रचार करणार नाहीत..., अजितदादांच्या निधनामुळे घेतला मोठा निर्णय!

त्यामुळे २८ जून २०१० ते २८ जून २०१५ या पाच वर्षाच्या या कालावधीसाठी विनायक निकम हे विरोधी पक्षनेता होते. २०१५ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी १०६ जागा जिंकल्या. त्यावेळी भाजप, शिवसेना, मनसे या राजकीय पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक हे एक अंकी संख्या पार करू शकले नाहीत. परिणामी २०१५ ते २०२० या कालावधीत महापालिकेत विरोधी पक्षनेता हे पद रिक्त राहिले.

दरम्यानच्या मागील पाच वर्षाच्या काळात निवडणुका झाल्या नाहीत. यावेळी सुद्धा बहुजन विकास आघाडी सत्तेच्या जवळ आहे. ११५ पैकी ७१ नगरसेवक बहुजन विकास आघाडीकडे आहेत. भाजपचे ४३ आणि एक शिवसेनेचा असे एकूण ४४ नगरसेवक महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीला यावेळी महापालिकेत विरोधी पक्षनेता हे पद मिळणार आहे. भाजपने गटनेता म्हणून अशोक शेळके यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता या नावासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्यासह मनोज पाटील आणि महेश सरवणकर या तिघांची नावे चर्चेत आहेत.

निष्ठावंतांना संधी द्यावी...

बहुजन विकास आघाडीकडे सत्ता राहणार असली तरी, विरोधी बाकावर सुद्धा यावेळी मोठी संख्या असणार आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेण्याकरिता भाजप योग्य चेहऱ्याची निवड विरोधी पक्षनेता म्हणून करणार आहे. अनेक वर्ष भाजप संघटन वाढविण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीलाच विरोधी पक्षनेते पद देण्यात यावे, तसेच इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश दिलेल्या व्यक्तीचा या पदाबाबत विचार होऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Vasai-Virar Municipal Corporation
Sanjay Raut : 'अजितदादांचे राजकारण स्वतंत्र बाण्याचे, शिंदेंप्रमाणे ते संघाच्या मुख्यालयात हजेरी द्यायला गेले नाहीत, भाजपमय झाले नाहीत...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com