Sharad Pawar, Nitish Kumar, Mallikarjun Kharge
Sharad Pawar, Nitish Kumar, Mallikarjun Kharge Sarkarnama

Nitish Kumar Breaking News : मोठी बातमी! नितीशकुमार मोदींना बाय- बाय करणार? इंडिया आघाडी संपर्कात, थेट उपपंतप्रधानपदाची ऑफर

Loksabha Election 2024 Result : इंडिया आघाडीत मित्रपक्ष सोबत आले तर त्यांना मोठे पदं दिले जाण्याची शक्यता आहे.

Loksabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर येत आहे. भाजप प्रणित एनडीएला मोठा धक्का बसला आहे. एक्झिट पोलमध्ये साडेतीनशे ते पावणे चारशेच्या आसपास पोहचवलेल्या भाजपला प्रत्यक्ष निकालात तीनशे पार पोहचणेही अवघड होऊन बसल्याचे दिसून येत आहे.त्याच धर्तीवर आता इंडिया आघाडीने आता सत्तेच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांना इंडिया आघाडीकडून मोठी ऑफर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या जेडीयूची चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्या एनडीए आघाडीचे घटक पक्ष असलेल्या नितीश कुमारांशी आघाडीतील वरिष्ठ नेते संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीत मित्रपक्ष सोबत आले तर त्यांना मोठे पदं दिले जाण्याची शक्यता आहे.

आजच्या निकालामुळे नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे.इंडिया आघाडीकडून नितीशकुमारांना थेट उपपंतप्रधानपद देणार असल्याची चर्चा आहे.तर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी निकालाचे कल हाती येताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संपर्क केल्याचेही दिसून येत आहे.

लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 298 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत.तर इंडिया आघाडी (India Alliance) 238 जागांवर आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहे.तर आंध्र प्रदेशात तेलुगू देसमचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत.यामुळे आता काँग्रेससह इंडिया आघाडीकडून टीडीपी सह जेडीयूला सोबत घेण्याच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Sharad Pawar, Nitish Kumar, Mallikarjun Kharge
Vishwajeet Kadam : 'जंगल भी हमारा...राज भी हमारा' सांगलीत विश्वजित कदमांनी फोडली डरकाळी!

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसह वरिष्ठ नेेतेमंडळी तेलगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडी बहुमताच्या आकड्याच्या जवळपास पोहोचल्यास मित्रपक्षांची मदत घेण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ शकते.

Sharad Pawar, Nitish Kumar, Mallikarjun Kharge
Lok Sabha Election 2024 Result : मोदी 350+, राहुल गांधींच्या ‘हाता’ची घडी; पुन्हा भाजपराज?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com