NCPI MP news : खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करताच पक्षात मोठी जबाबदारी; NCPIने उचललं महत्वपूर्ण पाऊल

TMC rebel MPs, Yusuf Pathan, Jagadish Chandra Verma, TMC MPs NCPI : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना एनसीपीआयची मोठी जबाबदारी; नवी कार्यकारिणी जाहीर करत युसूफ पठाण, जगदीश चंद्र वर्मा यांसह अनेकांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद.
TMC 20 rebel MPs
TMC 20 rebel MPsSarkarnama
Published on
Updated on

Nationalist Citizens Party of India update : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी १७ खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा एका बंडखोर खासदारानेच केला होता. त्यानंतर आता या खासदारांवर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे.

एनसीपीआयने तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या खासदारांना सोबत घेत नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये खासदार यूसूफ पठाण यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिप्रकाश चॅटर्जी यांनी २७ पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये पठाण यांच्यासह खासदार अबू ताहेर कान, दीपक अधिकारी देव आदींचा समावेश आहे.

खासदार जगदीश चंद्र वर्मा यांनीच पुढील काही दिवसांत १७ खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्यांनाही एनसीपीआने राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले आहे. त्याचप्रमाणे रचना बॅनर्जी, चंद्रिमा पांजा आणि मितालीबाग यांच्यावरही उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

TMC 20 rebel MPs
आमदार पाटलांची बातच न्यारी, पदाचा दोन महिन्यांत दोनदा राजीनामा

बप्पी हलदर यांच्यासह उतिया कुंडू, सुलेखा भूनिया, विवेक मिश्रा आणि सुवेंदू चक्रवर्ती हे सरचिटणीस असतील. विशेष म्हणजे या यादीत ज्येष्ठ खासदार सुदीप बंदोपाध्याय आणि काकोली घोष दस्तगीर यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे चर्चेतील खासदार सायोनी घोष यांनाही स्थान देण्यात आलेले नाही.

TMC 20 rebel MPs
BJP Political news : देशातील आणखी एक पक्ष फुटला; मित्रपक्षाचेच आठ आमदार भाजपच्या गळाला, रात्रीत फिरली चक्रं

खासदारांच्या बंडानंतर चार महिन्यांनी पक्षाने या नियुक्त्या केल्या आहेत. या खासदारांविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तृणमूल काँग्रेसने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एनसीपीआयमधील आपले विलीनीकरण कायदेशीर असल्याचा दावा या खासदारांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com