Shivsena UBT News : मराठवाड्यात ठाकरेंची नवी फिल्डिंग! 'मिशन लोकसभा'साठी 'या' शिलेदारांवर सोपवली मोठी जबाबदारी

Shiv Sena UBT contact chiefs announced in Marathwada : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'मिशन लोकसभा'साठी तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यातील संपर्कप्रमुखांची घोषणा करण्यात आली असून जाणून घ्या पक्षाची रणनीती.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पक्ष फुटीनंतरच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे, यासाठी उद्धव ठाकरे यांनी आतापासून नव्याने मतदारसंघांची बांधणी, संघटनात्मक रचना यावर काम सुरू केले आहे.

याचाच भाग म्हणून राज्यासह मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्क प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईतील पदाधिकाऱ्यांवर प्रामुख्याने संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
BJP leader Attack Case : भाजप नगरसेवकावर भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; शहरात प्रचंड खळबळ, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल!

हिंगोली-बबनराव थोरात, छत्रपती संभाजीनगर-आशिष चेंबूरकर, जालना-सुनील वामन पाटील, धाराशीव- सुनील काटमोरे, नांदेड-किशोर पोतदार, परभणी-प्रदीप कुमार खोपडे, लातूर-परमेश्वर सातपूते तर बीड लोकसभा मतदारसंघासाठी अशोक सकपाळ यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालवधी आहे. दरम्यान, मराठवाड्यातील राजकीय पडझड, कधी काळी ठाकरेंच्या शिवसेनेचे बालेकिल्ले असलेले हे मतदारसंघ नव्याने बांधण्याचे आव्हान नव्या संपर्क प्रमुखांसमोर असणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेची कामगिरी दमदार राहिली होती.

Uddhav Thackeray
Vasai Virar: गणेशोत्सवात ‘गैर हिंदू’ ठेकेदारांना काम देऊ नका! भाजप नेत्याचे महापालिका आयुक्तांना पत्र, विरारमध्ये खळबळ

महाविकास आघाडीने मराठवाड्यातील आठ पैकी सात मतदारसंघ जिंकले होते. यात एकट्या ठाकरेंच्या शिवसेनेने तीन जागा जिंकल्या होत्या. परभणी, धाराशीव आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटली होती. मात्र नुकत्याच राबवण्यात आलेल्या आॅपरेशन टायगरमध्ये ठाकरेंच्या तीनही खासदारांची शिकार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून झाली आहे.

या फोडाफोडीचा वचपा २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मराठवाड्यात विजय मिळवून घेण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले लोकसभा संपर्क प्रमुख हा या मोहिमेचाच भाग असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com