Pune News : आतापर्यंत अभिजीत बिचुकले यांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत, मात्र त्यांना एकाही निवडणुकीत यश आलेलं नाही. परंतु तरीही ते निवडणूक लढवताना दिसतात. एकेकाळी त्यांनी सातारा खासदार व भाजप नेते उदयनराजेंवरही हल्लाबोल केला. ते नेहमीच चर्चेतही असतात. बिचकुले हे बुधवारी (ता.22) पुन्हा एकदा चर्चेत आले. पुण्यात मोदी बाग येथे असलेल्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांनी भेट घेतली. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये योग्यवेळी प्रवेश करेल असं सांगितलं.
अभिजीत बिचुकले म्हणाले, दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज शरद पवार यांची भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाकडून बोलवणं आल्याने हा भेटीचा दुग्ध शर्करा योग जुळून आल्याचं बिचुकले यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहे. काही लोकांनी त्यांची भीष्म पितामहासारखी अवस्था केली आहे. मात्र, आगामी काळामध्ये शरद पवार यांनी मला बोलावणं धाडलं, तर मी श्रीकृष्ण प्रमाणे त्यांचं सारथ्य करायला तयार आहे.
शरद पवार हे राजकारणातले भीष्मपितामह आहे,मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार असून आगामी काळात योग्यवेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेईल असं देखील बिचुकले यांनी सांगितलं.
दिल्ली येथे होत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये मी सहभागी होणारा असून त्या ठिकाणी कवी संमेलनाचा वेगळा मंच तयार करण्यात आला आहे त्या ठिकाणी मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असणारा असल्याचं बिचुकले यांनी सांगितलं.
याआधी अभिजीत बिचुकले यांनी मुंबईमधील वरळी, पुण्यातील कसबा(पोटनिवडणूक) या मतदारसंघांमधूनही निवडणूक लढवलेली आहे. याशिवाय पंढरपूर-मंगळवेढा येथूनही निवडणुकीत नशीब आजमावले असून, 2024ची लोकसभा निवडणूकही त्यांनी कल्याण येथून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढवलेली आहे.
विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. पण त्याही निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.